पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

पोटात संसर्ग

पोटात संसर्ग तेव्हा होतो जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस पचनतंत्रात पसरतात.

डिहायड्रेशनचा त्रास

ही समस्या सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकते. वेळेत उपचार न झाल्यास डिहायड्रेशन किंवा इतर आजार उद्भवू शकतात.

कारणं

अस्वच्छ किंवा दूषित अन्न, शिळं जेवण, अर्धवट शिजवलेलं मांस, असुरक्षित पाणी किंवा अस्वच्छ हातांनी जेवण केल्याने पोटात संसर्ग होऊ शकतो.

जुलाब

पोटातील संसर्गाचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे जुलाब होणं. यातून शरीरात पाणी आणि मीठाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्वरित पाणी आणि ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन घेणं गरजेचं आहे.

उलटी

पोटात संसर्ग झाल्यास पचनतंत्रावर परिणाम होतो आणि वारंवार उलटी होऊ शकते.

पोटदुखी

पोटात सतत दुखणं हे संसर्गामुळे होणाऱ्या सूज आणि गॅसमुळे होतं. हे दुखणं जेवणानंतर किंवा उपाशीपोटी दोन्ही वेळा वाढू शकतं.

ताप

जर संसर्ग बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे झाला असेल तर शरीराचं तापमान वाढू शकतं. हलक्या तापासोबत थंडी वाजणे देखील जाणवू शकतं.

पाण्याची कमतरता

वारंवार जुलाब आणि उलटीमुळे शरीरात पाणी कमी होतं. ओठ कोरडे पडणं, चक्कर येण, लघवीचं प्रमाण कमी होणं आणि अशक्तपणा जाणवणं ही त्याची लक्षणं आहेत.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा