Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Surabhi Jayashree Jagdish

उकडीचे मोदक

गणपतीमध्ये उकडीचे मोदक करताना अनेकदा ते फुटतात.

सोपी ट्रिक

यासाठी एक सोपी पण महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे, मोदकाचे आवरण मळताना पिठाच्या प्रमाणात थोडं तूप वापरणं आणि ते पीठ चांगलं मळून घेणं.

पीठ मळताना तुपाचा वापर

मोदकासाठी पीठ मळताना गरम पाण्यात थोडं तूप किंवा तेल घाला. यामुळे पीठ चिकट होत नाही आणि मोदकाला एक चांगली चमकही येते.

पीठ चांगले मळा

पिठाचं आवरण मऊ आणि लुसलुशीत असणं खूप महत्त्वाचे आहे. पीठ मळून झाल्यावर लगेच मोदक न बनवता, ते 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

चिकटपणा

तुपामुळे पिठाचे कण मऊ होतात आणि पीठ अधिक लवचिक बनतं. योग्य तुपामुळे पीठ चिकट होत नाही आणि मोदक साच्यातून काढताना सहज बाहेर येतात.

गरम पाण्याचा वापर

पीठ मळताना पाणी चांगले गरम करून घ्या. पाणी कोमट असल्यास पीठ घट्ट होऊ शकते.

मोदक वाफवताना

मोदक वाफवण्यापूर्वी मोदकपात्रात पाणी गरम करून घ्या. मोदक वाफवताना झाकण लगेच उघडू नका, 5 मिनिटे तसेंच राहू द्या.

बेली फॅट कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावं लागतं?

येथे क्लिक करा