Surabhi Jayashree Jagdish
अनेकदा लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. अशा वेळी बहुतेक लोक अन्न खाणं-पिणं सोडून देतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की, अन्न सोडणं हा उपाय नाही. चला तर मग, यावरचा रामबाण उपाय जाणून घेऊया.
बेली फॅट कमी करण्यासाठी रोज चालणे खूप आवश्यक आहे.
रोज चालताना आपण किती वेळ चालायचं हे देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
सुरुवातीच्या दिवसांत दररोज ३० मिनिटं जलद चालण्याचं लक्ष्य ठेवा. यामुळे दररोज साधारण १५० ते २०० कॅलरीज बर्न होऊ शकतात.
ज्यांना लवकर वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज ६० मिनिटं ब्रिस्क वॉक करणं आवश्यक आहे. यामुळे ३०० ते ४०० कॅलरीजपर्यंत बर्न होऊ शकतात.
यासोबतच तुम्हाला आपल्या आहाराकडे देखील विशेष लक्ष द्यायला हवं. दररोज व्यायाम केल्यानेही बेली फॅट कमी होऊ शकतं.