Surabhi Jayashree Jagdish
यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात व्यस्त अवयव असून तो ४०० पेक्षा अधिक काम करतो.
चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरमध्ये घाण जमा होऊ लागते. मुळात यावेळी शरीर आपल्याला काही संकेत देतं.
चुकीचा आहार, अल्कोहोल, फॅटयुक्त खाणं तसंच काही औषधं यांच्यामुळे लिव्हर सुस्त होते. परिणामी विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात.
पोटाच्या वरील बाजूला वेदना होणं लिव्हरमध्ये गडबड असल्याचं पहिलं लक्षण आहे.
लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात द्रव पदार्थ जमा होतो. यामध्ये पायांमध्ये सूज येऊ लागते.
लिव्हर टॉक्सिक गोष्टींना फॅट सेल्समध्ये स्टोर करू लागतं तेव्हा वजन वेगाने वाढू लागतं.
ज्यावेळी लिव्हर योग्य पद्धतीने काम करत नाही तेव्हा शरीरात एलर्जीचं प्रमाण वाढतं.