Home Remedies For White Hair : हल्ली प्रत्येक वयोगटातील लोक केसाच्या अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. केस गळणे, केसांत कोंडा होणे, केस विरळ होणे यांसारख्या समस्यांना ते सतत सामोरे जात असतात.
चेहऱ्याचे मुख्य आकर्षण असतात ते केस. लांबसडक व काळेभोर केस कोणाला नकोत. हल्ली केसांना जपण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केस वाढतील इतकीच अपेक्षा असते. परंतु, कितीही महागडे उत्पादने वापरली तरी केस हे पांढरेच होतात जर तुम्हालाही केस काळेभोर व दाट करायचे असतील तर आयुर्वेदातील शिकाकाई वापरुन पाहा.
2. कसा तयार कराल शाम्पू
शिकाकाई- 250 ग्रॅम
रीठा - 100 ग्रॅम
मेथीचे दाने दाना - 100 ग्रॅम
सुकवलेला आवळा (Amala)– ५० ग्रॅम
कडुलिंबाची सुकलेली पाने - मूठभर
कडीपत्त्याची पाने - मूठभर
3. याप्रकारे बनवा
शिकाकाईचा शाम्पू बनवण्यासाठी वरील सर्व साहित्य कोरडे वाटून घ्या. त्यानंतर वरुन मीठ घालून चाळणीने गाळून घ्या. बंद डब्यामध्ये भरुन ठेवा. आठवड्यातून दोन वेळा केस धुताना याचा वापर करा. नियमितपणे वापर केल्यास केस घनदाट ते काळे देखील होतील.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.