Home Remedies For Hair Falls : विंचरताना केस सतत गळतात-तुटतात ? किचनमधील हा आयुर्वेदिक हेअर स्प्रे करेल केस गळतीवर जादू...

Hair Loss Spray : जर तुमचे केसही प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर किचनमधील या पदार्थांपासून बनवलेला हेअर स्प्रे रामबाण ठरेल.
Home Remedies For Hair Falls
Home Remedies For Hair FallsSaam tv
Published On

Hair Falls Solution : केसगळतीच्या समस्येवर अनेकजण उपाय सांगतात. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते आपल्या भली मोठी औषधांची लिस्ट देतात. पण याने मात्र केसांची वाढ ही होत नाही व केसगळती देखील थांबत नाही.

सध्या केसगळती व केसांच्या इतर समस्या हा एक सामान्य आजार वाटू लागला आहे. केसांच्या वाढीसाठी आपल्याला चांगल्या खाण्यापिण्यासोबतच त्याच्या इतर अनेक समस्यांवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. केसगळती का होते ? याविषयी अनेकांना माहीत नसेल.

Home Remedies For Hair Falls
White Hair Remedies : उरलेली चहापत्ती फेकून देताय ? पांढऱ्या केसांवरती डायसारखं काम करेल; अशाप्रकारे लावा

प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वांच्या (Vitamins) कमतरतेमुळे केसगळती होते. पण खाण्यासोबतच आपल्याला केसांसाठी अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ (Food) असतात ज्याच्या मदतीने आपण केसगळतीवर उपाय करु शकतो. जर तुमचे केसही प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर किचनमधील या पदार्थांपासून बनवलेला हेअर स्प्रे रामबाण ठरेल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. हेअर स्प्रे साहित्य

  • पाणी - १ वाटी

  • कांद्याच्या बिया - १ वाटी

  • मेथी दाण्याचा पावडर - १ वाटी

  • रोझमेरीची पाने - १ वाटी

  • कढीपत्ता - मूठभर

Home Remedies For Hair Falls
Priya Varrier : आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची; मला पागल करतेय ग...!

2. कसा बनवाल ?

  • सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात पाणी गरम करा.

  • त्यात हळूहळू सर्व पदार्थ त्यात घालून पाणी उकळवून घ्या.

  • तयार पाणी थंड झाल्यानंतर गाळून स्प्रे बाटलीत भरुन घ्या

  • हा पाणी तुम्ही ३० दिवस वापरु शकतात.

3. हा हेअर स्प्रे कसा काम करतो

हेअर स्प्रेमध्ये वापरले जाणारे कांद्याच्या बिया, मेथी दाणे, रोझमेरी पाने, कढीपत्ता (Curry leaves) हे केस वाढीसाठी रामबाण आहेत. याच्या वापरामुळे केस गळती थांबते, केसांतील कोंडा कमी होतो. तसेच याच्या पावडर बनवून हेअर मास्क बनवून केसांना लावल्यासही फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com