कोमल दामुद्रे
वयाच्या ३० व्या वर्षी आपले शरीर अधिक सुदृढ असते.
वयाची ४० शी ओलांडल्यानंतर निरोगी राहणे, वजन कमी करणे, परफेक्ट शेपमध्ये राहणे आणि स्नायू मजबूत करणे हे तितकं सोपं नाही.
पण जर तुम्हाला तरुण राहायचे असेल, तर तुम्हाला वयाच्या ३० वर्षीपासून तुम्हाला या ६ गोष्टी करायला हव्याच
स्वत:ची काळजी घेताना अनेक जण दुर्लक्ष करतात. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, वेळीच काळजी घेतली की, वृद्धत्व कमी करण्यास मदत होऊ शकते.
झोपेचा अभाव केवळ तुमच्या दिसण्यावरच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि मूडवरही परिणाम करतो. म्हणूनच जर तुम्हाला सुरकुत्या टाळायच्या असतील तर तुम्हाला वेळेवर झोपावे लागेल.
निरोगी चमकदार त्वचेपासून ते उत्तम पचनापर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हा एक सोपा उपाय आहे. म्हणूनच दररोज किमान ८ ग्लास पाणी प्या.
आपल्या चेहऱ्यावरुन कळते की, आपला मूड कसा आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करा.
शरीरासाठी दररोज किमान 20 मिनिटे चालणे आवश्यक आहे. याशिवाय चरबी वितळवण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
वृद्धत्व म्हणजे केवळ शरीरावर लक्ष केंद्रित करणे नव्हे तर मानसिक कौशल्ये राखणे गरजेचे आहे.
आपल्या आहारात नेहमी निरोगी पदार्थ असायला हवे. वयाची ३० वी ओल्याडल्यानंतर साखर व जंक फूड सारख्या पदार्थांचे सेवन कमी करायला हवे.