

घरातील स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याचं ठिकाण नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याशी आणि आनंदाशीही त्याचा संबंध असतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराला घरातील ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. त्यामुळे किचन कोणत्या दिशेला असावं, यासोबतच त्याच्या भिंतींना कोणता रंग द्यावा, याकडेही लक्ष दिलं जातं.
वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, योग्य रंगांची निवड केल्यास घरात सकारात्मक वातावरण आणि सुख-शांती टिकून राहण्यास मदत होते. चला तर मग, किचनच्या भिंतींसाठी कोणते रंग शुभ मानले जातात आणि कोणत्या दिशेला कोणता रंग निवडावा, हे जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, रंगांचा परिणाम माणसाच्या मनावर, वागण्यावर आणि घरातील वातावरणावर होऊ शकतो. किचनमध्ये वापरलेल्या रंगांमुळे तिथलं वातावरण उत्साही, शांत किंवा प्रसन्न वाटू शकते. त्यामुळे स्वयंपाकघराच्या भिंती आणि आतील सजावटीसाठी योग्य रंग निवडणं महत्त्वाचं मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, केशरी रंग हा ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो. या रंगामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसंच कुटुंबातील नातेसंबंध अधिक चांगलं होण्यासही हा रंग उपयुक्त मानला जातो. पूर्व दिशेला असलेल्या किचनसाठी केशरी रंग शुभ मानला जातो.
पांढरा रंग स्वच्छता, साधेपणा आणि शांततेचे प्रतीक आहे. या रंगामुळे किचन स्वच्छ, मोकळे आणि प्रशस्त दिसते. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, पांढऱ्या रंगामुळे घरात शांत वातावरण राहण्यास मदत होऊ शकते. वायव्य दिशेला असलेल्या किचनसाठी पांढरा रंग शुभ मानला जातो.
हिरवा रंग निसर्ग आणि समतोलाचं प्रतीक मानला जातो. या रंगामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि स्वयंपाकघरातील वातावरण प्रसन्न व ताजेतवानं वाटतं. किचनमध्ये शांत आणि नैसर्गिक वातावरण हवं असेल तर हिरव्या रंगाचा वापर करता येतो.
गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक नातेसंबंधांचं प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, या रंगामुळे घरातील सदस्यांमध्ये जवळीक आणि आपुलकी वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र वेळ घालवायला आवडतो, त्यांच्या किचनसाठी गुलाबी रंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
नारंगी आणि विटकरी लाल रंग (Brick Red) हे ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक मानले जातात. या रंगांमुळे किचनला आकर्षक आणि उठावदार लूक मिळतो. तसंच स्वयंपाकघरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साही वाटण्यास मदत होते. आग्नेय दिशेला असलेल्या किचनसाठी नारंगी आणि विटकरी लाल रंग योग्य मानले जातात.
तपकिरी रंगामुळे किचनला उबदारपणा आणि स्थिरतेचा अनुभव मिळतो. या रंगामुळे स्वयंपाकघराचे सौंदर्यही वाढतं. याशिवाय पिवळा रंग आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. ज्या किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश कमी येतो, तिथे पिवळ्या रंगाचा वापर केल्यास जागा अधिक उजळ आणि प्रसन्न दिसू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे, यानुसार त्याच्या भिंतींच्या रंगाची निवड करणं योग्य मानलं जातं. प्रत्येक दिशेसाठी काही विशिष्ट रंग सुचवले आहेत.
पूर्व दिशेला असलेलं किचन- हिरवा, केशरी आणि बेज रंग शुभ मानले जातात.
पश्चिम दिशेला असलेलं किचन- पांढरा, राखाडी, चंदेरी आणि सोनेरी रंग निवडता येतात.
उत्तर दिशेला असलेलं किचन- निळा, राखाडी आणि हिरवा रंग योग्य मानले जातात.
दक्षिण दिशेला असलेलं किचन- लाल, पिवळा, नारंगी, हिरवा आणि बेज रंग वापरता येतात.
किचनच्या भिंतींचा रंग निवडताना वास्तुशास्त्रातील मान्यतांसोबतच घरातील प्रकाश, जागेचा आकार आणि आपल्या आवडीचाही विचार करावा. योग्य रंग निवडल्यास स्वयंपाकघर अधिक सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न दिसू शकतं.
या बातमीमध्ये गरुड पुराणातील प्रेतखंड तसेच हिंदू धार्मिक परंपरेत आढळणाऱ्या वर्णनांच्या आधारे मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था, पुढील शरीर आणि पुनर्जन्मासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.