दात घासण्याचा ब्रश कधी बदलायचा? ही ५ लक्षणे दिसताच सावध व्हा

When to Replace Your Toothbrush : दात घासण्याचा टूथब्रश कधी बदलायचा? जुना ब्रश बदलण्याची ५ महत्त्वाची लक्षणे आणि दर ३ ते ४ महिन्यांनी नवीन ब्रश वापरण्याचे फायदे जाणून घ्या.
 When to Replace Your Toothbrush
When to Replace Your ToothbrushSaam TV
Published On: 

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करण्याची सवय ही आपल्या दिनचर्येचा भाग आहे. दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रशचा वापर करतो. पण तुम्ही रोज वापरत असलेला टूथब्रश किती झिजलेला असतो? तो कधी बदलायचा? हे देखील तुमच्या लक्षात येणे महत्वाचे आहे. बरेच लोक वर्षभर एकच टूथब्रश वापरतात त्यामुळे टूथब्रश झिजून जातो. टूथब्रश खराब झाल्याची, झिजल्याची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे ही चिन्हे कोणती आहेत ते सविस्तरपणे जाणून घ्या.

 When to Replace Your Toothbrush
Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

किती महिन्यानंतर टूथब्रश बदलला पाहिजे?

हेल्थ अपडेटनुसार, टूथब्रश साधारणपणे दर ३ ते ४ महिन्यांना बदलला पाहिजे. टूथब्रशच्या नियमित वापरामुळे टूथब्रशचे केस झिजतात ज्यामुळे त्याच्या स्वच्छ करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जर तुमचा टूथब्रश तीन महिन्यांच्या आतच ब्रशचे केस झिजलेले दिसू लागले तर नवीन टूथब्रश घेणे योग्य राहील.

 When to Replace Your Toothbrush
पाण्यात की दुधात, ड्रायफ्रुट्स कशामध्ये भिजून खावे?

टूथब्रश कसा ओळखायचा?

  • टूथब्रशचे केस पसरतात

    जर टूथब्रशचे केस सरळ राहण्याऐवजी सर्व बाजूंनी पसरले असतील तर तो टूथब्रश बदलण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या.

  • केस वाकू लागतात

    नियमितच्या वापरामुळे किंवा जास्त जोराने दात घासल्याने ब्रशचे केस वाकू शकतात अशा ब्रश बदलणे महत्वाचे आहे.

  • ब्रशचे केस तुटतात

    जर टूथब्रशचे केस तुटलेले किंवा जास्त झिजलेले दिसत असती तर नवीन ब्रश वापरा.

  • तीन ते चार महिन्यांनी बदलावा

    ब्रश दिसायला ठिक असला तरी तीन ते चार महिन्यांनी बदलणे महत्वाचे आहे.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.