ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकजण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम दात घासून दिवसाची सुरुवात करतात.
दात घासल्याने दात स्वच्छ होतात, दुर्गंधी येत नाही.
दात घासताना आपण टूथब्रशचा वापर करतो. परंतु टूथब्रथ कधी बदलायला हवा हे कोणालाच माहित नसते.
अनेकजण महिनोंमहिने टूथब्रश बदलत नाही. त्यामुळे दातांचे नुकसान होते.
साधारणपणे ३ महिन्यांनंतर टुथब्रश बदलला पाहिजे.
जर तुम्ही अनेक महिने एकच ब्रश वापरला तर तुम्हाला दातांचे विकार होऊ शकतात.
ब्रश साफ करण्यासाठी फक्त पाणी पुरेसे नसते. त्यामुळे ब्रश हा नियमितपणे बदलला पाहिजे.
जास्त दिवस एकच ब्रश वापरल्याल त्यात बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.