ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या घरातल्या मसाल्यांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हळद.
हळदीचे अनेक फायदे आहेत. एखाद्या जखमेवर हळद लावल्याने ती लवकर बरी होते.
हळदीमध्ये नैसर्गित अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमांचे जंतुपासून संरक्षण होते.
श्वसनाचा किंवा सर्दी- कफचा त्रास असल्यास हळद दूध प्यावे. हळद दूध प्यायल्याने छातीत साठलेला कफ कमी होण्यास मदत होते.
ज्या व्यक्तींना सकाळी अॅसिडीटीचा त्रास होतो. त्यांना सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात हळद घेण्याचा सल्ला दिला जातो.
हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी व्हायरल, अँटी फंगल, अॅंटी म्युटाजेनिक आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म आहे.
हळदीमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच रक्तप्रवाह चांगला होतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.