First Shravan Monday 2026 : श्रावणातील पहिला सोमवार कधी? पूजा कशी करावी आणि कोणती शिवमूठ वाहावी?

Shravani Somwar 2026: पहिला श्रावणी सोमवार हा १७ ऑगस्ट २०२६ रोजी आहे. या दिवशी शिवपूजा, अभिषेक उपवास आणि तांदळाची शिवमूठ अर्पण करण्याचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या तसेच संपूर्ण पूजा विधी व परंपरा वाचा.
First Shravan Monday 2026
First Shravan Monday 2026meta ai
Published On

श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महादेवाची पूजा, अभिषेक आणि सोमवारचे व्रत करतात. भगवान भोलेनाथ अल्प भक्तीनेही प्रसन्न होतात, अशी श्रद्धा असल्यामुळे इच्छा पूर्ण व्हावी, कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी तसेच कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी अनेकजण श्रावणी सोमवारचे व्रत करतात.

यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात १३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून त्याचा शेवट ११ सप्टेंबर २०२६ रोजी होईल.

श्रावणी सोमवारच्या तारखा

यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार श्रावणी सोमवार आहेत. पहिला श्रावणी सोमवार १७ ऑगस्ट, दुसरा २४ ऑगस्ट, तिसरा ३१ ऑगस्ट आणि चौथा ७ सप्टेंबर २०२६ रोजी येत आहे. या चारही सोमवारचे विशेष धार्मिक महत्त्व मानले जाते. अनेक भाविक या दिवशी उपवास करतात. काहीजण फळहार किंवा फक्त पाणी घेऊन व्रत करतात. तर काहीजण निर्जल उपवासही करतात.

First Shravan Monday 2026
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ८व्या वेतन आयोगाआधी DA इतका वाढणार; पगारात मोठी वाढ

उपवास करण्याची पद्धत

श्रावणी सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर शिवलिंगाचा शुद्ध पाण्याने आणि नंतर दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. शिवलिंगावर भस्म, बेलपत्र, धतुरा, फुलं अर्पण करून धूप, दीप आणि नैवेद्य दाखवत विधीवत पूजा करा. शक्य असेल तर जवळच्या शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्या आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी आरतीनंतर व्रत सोडा.

First Shravan Monday 2026
Government Scheme : गर्भवती महिलांसाठी मोठी खुशखबर! सरकार देत आहे ₹5,000 ते ₹6,000; या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ

श्रावण महिन्यात शिवमूठ वाहण्याचीही विशेष परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मूगाची आणि चौथ्या सोमवारी जवाची शिवमूठ भगवान शिवाला अर्पण करावी केली जाते. यामुळे भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com