Government Scheme : गर्भवती महिलांसाठी मोठी खुशखबर! सरकार देत आहे ₹5,000 ते ₹6,000; या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

Pregnant Women Yojana : सरकारच्या काही योजनांअंतर्गत पात्र गर्भवती महिलांना ₹5,000 ते ₹6,000 पर्यंत आर्थिक मदत मिळते. पात्रता, लाभ अर्ज प्रक्रिया आणि कोणत्या महिलांना फायदा मिळतो ते जाणून घ्या.
PM Matru Vandana Yojana
PM Matru Vandana Yojana meta ai
Published On

केंद्र सरकार नेहमीच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत करत असतं. आता गर्भवती महिला आणि नवजात बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी केंद्र सरकार पीएम मातृ वंदना योजना (PM Matritva Vandana Yojana - PMMVY) राबवत आहे. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान आवश्यक आरोग्य सेवा, पोषण आणि मेडिकल टेस्ट घेणं जास्त सोयीस्कर होईल. विशेषत: आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतो.

पीएम मातृ वंदना योजनेत किती मदत मिळते?

महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे माता आणि नवजात बालकाचे आरोग्य सुधारणे तसेच गर्भधारणेच्या काळात महिलांना आर्थिक मदत आणि सोयी उपलब्ध करून देणे हा आहे. योजनेनुसार पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पात्र महिलेला ५००० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. तसेच दुसऱ्या अपत्याच्या वेळेस मुलगी असेल तर ६००० रुपये मदत दिली जाते. या आर्थिक मदतीमुळे महिलांना पौष्टिक आहार, आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी मदत मिळते.

PM Matru Vandana Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

पात्र महिलांचे वय किती असावे?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांना मिळतो. गर्भधारणेमुळे उप्तन्न किंवा मजुरीचं नुकसान झालेल्या महिलांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं. बाळाच्या जन्मानंतर २७० दिवसांच्या आत अर्ज करता येतो. दुसरे अपत्य मुलगी असल्यावरही जास्त लाभ मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

PM Matru Vandana Yojana
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ८व्या वेतन आयोगाआधी DA इतका वाढणार; पगारात मोठी वाढ

आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरलेली आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग महिला, दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील महिला, ई-श्रम कार्डधारक, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) लाभार्थी, महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्डधारक, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिला, अंगणवाडी आणि आशा सेविका तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत रेशन कार्डधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com