DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ८व्या वेतन आयोगाआधी DA इतका वाढणार; पगारात मोठी वाढ

DA Increase 2026 : CPI-IW जून २०२६ आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै पासून लाभ लागू होऊ शकतो.
DA Hike
DA Hikemeta ai
Published On

केंद्र सरकारच्या एक कोटीहून जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता (DA) वाढीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोने जून २०२६ चा CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) डेटा जाहीर केला असून, त्यानुसार महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ६० टक्के असलेला DA वाढून ६३ टक्के होऊ शकतो.

DA वाढीचं कॅलक्युलेशन

लेबर ब्युरोने जून २०२६ साठी CPI-IW निर्देशांक १५१.९ इतका जाहीक केला आहे. मे २०२६ मध्ये हा आकडा १५०.८ होता. जून महिन्याचा हा अंतिम डेटा जुलैपासून लागू होणाऱ्या DA वाढीच्या गणनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या आकडेवारीनुसार ७ व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार DA ६३.७५ टक्के इतका येत आहे.

मात्र केंद्र सरकारच्या सध्याच्या पद्धतीनुसार दशांश आकडे विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ६३ टक्के DA मिळण्याची शक्यता जास्त आहे. ६३ टक्के DA मिळण्यासाठी आवश्यक तेवढा निर्देशांक वाढलेला नाही.

DA Hike
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

वाढीव DA कधी मिळणार?

महागाई भत्त्यातली ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच जाहीर केला जाईल. मागच्या काही वर्षांचा अनुभव पाहता, जुलै महिन्याच्या DA वाढीची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केली जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव DA सोबतची थकबारी Arrears सुद्धा मिळू शकते.

DA Hike
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठा बदल, आज वाढ झाली की घसरण; तुमच्या शहरातील १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

कोणाला किती फायदा होईल?

बेसिक सॅलरी ₹ १८,००० असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहिना ₹५४० अतिरिक्त मिळू शकतात. बेसिक सॅलरी ₹३५,४०० असेल तर महिन्याला ₹१,०६२ वाढ होऊ शकते. बेसिक सॅलरी ₹५६,१०० असलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्याला १,६८३ जास्त मिळण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनाही महागाई सवलत (Dearness Relief - DR) स्वरुपात या वाढीचा लाभ मिळणार आहे.

टीप: महागाई भत्त्याचा अंतिम दर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच अधिकृत मानला जाईल. सध्या ही माहिती उपलब्ध CPI-IW आकडेवारी आणि विद्यमान गणना पद्धतीवर आधारित आहे.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com