

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी
सरकार करणार हे अकाउंट बंद
केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला दिले निर्देश
जगातील असंख्य लोक रोज व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता केंद्र सरकार काही व्हॉट्सअॅप अकाउंट ब्लॉक करणार आहे. सरकारने डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचण्यासाठी मोठी कारवाई केली आहे.
अनेकदा व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल स्कॅम होतात. यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान होते. यालाच आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता डिजिटल अरनेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅप आयडीला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेकदा व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप कॉलद्वारे डिजिटल स्कॅम होतो. गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या सायबर विंग इंडियन सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटर (14C) च्या रिपोर्टनुसार ही कारवाई केली जाणार आहे. अनेकदा स्कॅमर्स सारखे नवीन अकाउंट तयार करतात. याच अकाउंटवर बंदी घालण्याचा प्रयत्न आहे.
व्हॉट्सअॅपवर Skype सारखे सेफ्टी फीचर्स आणण्याचा विचार करत आहे. IT Rules 2021 अंतर्गत डिलिट अकाउंटचा डेटा १८० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. याची चौकशी एजन्सीच्या मदतीने केली जाईल, याचसोबत APK किंवा खोटे अॅप्स ओळखून ते ब्लॉक करण्याच्या तयारीत आहे.
व्हॉट्सअॅप खूप लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या अॅपवरुन फ्रॉड होतात. याच सायबर फ्रॉड करणाऱ्यांचे डिव्हाइस आयडी आता ब्लॉक केले जाणार आहे. जेणेकरुन फ्रॉडला आळा बसेल.
डिव्हाइस IDs काय आहे?
डिव्हाइड आयडी ही तुमच्या फोनची ओळख असते. हा एक युनिक नंबर असतो. डिव्हाइल आयडी IMEI नंबर, मैक अॅड्रेस , डिवाइस सीरियल नंबर और एडवर्टाइजिंग नंबर असू शकतो. मॅक अॅड्रेसद्वारे नेटवर्क कोणते वापरतात याची माहिती मिळते. यामुळे फ्रॉड डिव्हाइस आयडी ब्लॉक करण्यास मदत होणार आहे.
डिजिटल अरेस्ट काय आहे?
डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे गुन्हेगार स्वतः ला पोलिस सांगून युजर्सला घाबरवतात. त्यांनी व्हॉट्सअॅपवर धमकी देतात. त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. यालाच डिजिटल अरेस्ट म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.