

WhatsApp हे आपल्या दैनंदिन आयुष्यातली महत्वाची गरज आहे. त्यामध्ये अनेक महत्वाचे कामाचे मेसेज येतात, एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत सहज व्हिडीओ कॉल करता येतो, तुम्हाला स्टेटस ठेवून शुभेच्छा देता येतात. तसेच त्या व्यक्तीला स्टेटस मेन्शन करता येतो, महत्वाचे pdf सेव्ह करता येतात. त्यातच WhatsApp युजर्ससाठी आणि iphone वापरकर्त्यांसाठी एक खास फिचर आणले आहे.
तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी चॅट करत असाल आणि तुम्हाला काही गोष्टी शब्दात मांडण्यापेक्षा इमोजीच्या वापरातून मांडायच्या यामध्ये सोय मिळणार आहे. Meta Platformsच्या मालकीच्या WhatsApp ने iPhone यूजर्ससाठी Sticker Suggestion फीचर आणलं आहे. यामध्ये युजर जेव्हा चॅटिंग करताना कोणताही इमोजी टाइप करतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित स्टिकर्स आपोआप स्क्रीनवर दिसतात. युजरला त्यातून हवा असलेला स्टिकर निवडून फक्त एकदा टॅप करायचा असतो आणि तो लगेच चॅटमध्ये पाठवला जातो. त्यामुळे चॅटिंग जास्त फास्ट आणि मजेदार होईल.
WhatsApp च्या या फीचरचा वापर करणं खूप सोपं आहे. सगळ्यात आधी iPhone मध्ये WhatsApp उघडून कोणत्याही व्यक्तीचा चॅट ओपन करायचा. त्यानंतर चॅट करताना कोणताही इमोजी किंवा एक्सप्रेशन टाइप केल्यावर वर स्टिकर सजेशन दिसतील. त्यापैकी आवडता स्टिकर निवडून टॅप केल्यावर तो लगेच पाठवता येईल.
नव्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटनुसार, सध्या हे फीचर WhatsApp च्या iOS 26.8.76 या लेटेस्ट व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. जर अजूनही हे फीचर दिसत नसेल तर iPhone वापरणाऱ्यांनी App Store मध्ये जाऊन WhatsApp अपडेट करणे आवश्यक आहे. सध्या हा अपडेट फक्त iOS वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध असला तरी लवकरच Android युजर्सनाही हा फीचर मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे WhatsApp फक्त त्याच स्टिकर्सचे सजेशन देईल जे आधीपासून तुमच्या स्टिकर लायब्ररीमध्ये सेव्ह असतील. जर नवीन स्टिकर्स वापरायचे असतील तर स्टिकर आयकॉनवर जाऊन ‘+’ बटणावर टॅप करून नवीन स्टिकर पॅक डाउनलोड करता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.