Blood Pressure Medicine Timing: BP ची औषधं सकाळी घ्यावीत की रात्री? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ अन् महत्त्वाचं कारण

BP Medicine : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी BPची औषधे सकाळी घ्यावीत की रात्री, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. तज्ज्ञांच्या मते योग्य वेळेत औषधे घेतल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
BP Medicine
Blood Pressure Medicine Timinggoogle
Published On

सध्याची जीवनशैली खूप धक्काधकीची झाली आहे. त्यामुळे शरीराला जास्त ताकदलावून त्याची रोजची कार्य पार पाडावी लागतात. बऱ्याच जणांना कामाच्या धावपळीमुळे स्वत: कडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे लहान सहान वाटणारी दुखणी लोक सहजपणे दुर्लक्षित करतात. पण याच समस्यांना दुर्लक्षित केल्याने तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

पुढील बातमीत आपण अनेकांच्या मनातल्या समस्या जाणून घेणार आहोत. या समस्या तुमच्या उच्च रक्तदाबाच्या संबंधीत असणार आहेत. ज्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तरच तुम्हाला यातून सुटका मिळू शकते. मुळात तुम्हाला जेव्हा डॉक्टर BP (High Blood Pressure) तपासून औषधं देतात, तेव्हा त्यांच्या वेळाही सांगतात. पण बऱ्याच जणांना त्याचा आराम येत नाही. किंवा वाढत्या ब्लड प्रेशरचा धोका वाढतच असतो. अशावेळेस तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही नियम पाळून औषधं घेणं गरजेचं असतं. याने हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

BP Medicine
Chiffon Saree Cleaning: शिफॉन साड्यांची चमक धुतल्याने जातेय? टेन्शन सोडा या 7 टिप्स करा फॉलो

बऱ्याच जणांना एक समस्या असती ती म्हणजे रक्तदाबाच्या गोळ्या सकाळी घ्यायच्या की संध्याकाळी? तर याचं उत्तर पहिलं तर तुम्ही रोजच्या रोज गोळ्या खाल्यानंतर एका जागी शांत बसून तुमच्या BP तपासा. याने तुम्हाला खुप मोठा फायदा होईल. कारण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता. तेव्हा तुमच्या मनातल्या भितीमुळे, प्रवासामुळे तुमच्या BPत बदल झालेला असतो.

तज्ज्ञांच्या मते, रक्तदाबाची औषधे सकाळी घेण्याऐवजी रात्री घेतल्याने रक्तदाब जास्त चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहू शकतो. काही संशोधनांमध्ये असंही आढळलं आहे की, रात्री औषधं घेतल्यावर हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका जवळपास 45 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. या पद्धतीला Chronotherapy असे म्हटले जाते.

रात्री झोपेत असताना BP साधारणपणे 10 ते 20 टक्क्यांनी कमी होतो. पण काही उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये ही नैसर्गिक घट होत नाही. अशा रुग्णांसाठी औषधांची वेळ बदलणं फायदेशीर ठरू शकतं. तसेच सर्व औषधं रात्री घेणं योग्य नसतं. उदाहरणार्थ, डाएयुरेटिक्स म्हणजेच वॉटर पिल्स रात्री घेतल्यावर सतत लघवीला जावं लागतं आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

टीप: औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू किंवा बंद करू नयेत. तसेच वेळेबद्दलही तज्ज्ञांची सहमती घ्यावी. याच्याशी साम टिव्ही समर्थन करत नाही.

BP Medicine
Chiffon Saree Cleaning: शिफॉन साड्यांची चमक धुतल्याने जातेय? टेन्शन सोडा या 7 टिप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com