Sakshi Sunil Jadhav
शिफॉन साडी ही खूप हलकी, सॉफ्ट आणि आकर्षक फॅब्रिक असतं. पण या साडीची चमक आणि सौंदर्य कायम ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे खूप गरजेचं असतं.
साड्या चुकीच्या पद्धतीने धुतल्याने किंवा साठवल्याने साडीचा रंग फिका पडू शकतो. त्यामुळे शिफॉन साडी वापरताना आणि धुताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
शिफॉन साडी कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये. ती नेहमी थंड पाण्यात आणि माइल्ड डिटर्जंट वापरून हलक्या हाताने धुवा.
साडी धुतल्यानंतर ती जोराने पिळू नका. त्यामुळे फॅब्रिकचे नाजूक धागे तुटू शकतात आणि साडीची चमक कमी होऊ शकते.
शिफॉन साडी कधीही थेट सूर्यप्रकाशात वाळत घालू नका. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे साडीचा रंग फिका होऊ शकतो.
साडी धुतल्यानंतर नेहमी थंड किंवा सावलीच्या ठिकाणी सुकवा. त्यामुळे फॅब्रिक सुरक्षित राहते.
शिफॉन साडीवर थेट गरम इस्त्री करू नका. साडीवर सूती कापड ठेवूनच हलक्या तापमानावर प्रेस करा.
मेटल हॅंगरवर साडी टांगू नका. त्याऐवजी प्लास्टिक किंवा पॅडेड हॅंगरचा वापर करा, त्यामुळे साडी फाटण्याची शक्यता कमी होते.
शिफॉन साड्या मलमलच्या कापडात किंवा कॉटन बॅगमध्ये गुंडाळूनच कपाटात ठेवा.
परफ्यूममधील केमिकल्समुळे साडीवर हट्टी डाग पडू शकतात, त्यामुळे थेट साडीवर परफ्यूम फवारणं टाळा.
साडी वापरल्यानंतर लगेच कपाटात ठेवू नका. थोडा वेळ हवेत ठेवून नंतरच व्यवस्थित साठवा.