Whatsapp New Features: व्हॉट्सअ‍ॅपच नवं अपडेट! चॅटिंगपासून स्टेटस अपलोडिंगपर्यंत एकाच वेळी वापरता येणार, पाहा मजेशीर फीचर

WhatsApp New Features Update : व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणली आहे. यामुळे आपल्याला अनेकांशी सहज कनेक्ट होता येते.
WhatsApp New Features Update: WhatsApp gives Chatting and status-uploading related feature
WhatsApp New Features Update: WhatsApp gives Chatting and status-uploading related featureSaam tv

WhataApp Rolling Out New Feature:

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणली आहे. यामुळे आपल्याला अनेकांशी सहज कनेक्ट होता येते.

मेटाच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये येत्या काही दिवसांत अनेक जबरदस्त फीचर्स येत आहे. हे फीचर्स अँड्रॉइड आणि आयओएसच्या बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या (Whatsapp) या नव्या फिचरमध्ये साइडबारशी संबंधित माहिती समोर आली आहे. या साइडबारमध्ये वापरकर्त्यांना एकाच वेळी ग्रुप, चॅनेल, स्टेटस आणि चॅट्सचा वापर करता येणार आहे.

WhatsApp New Features Update: WhatsApp gives Chatting and status-uploading related feature
Kashmir Tour Package: बजेटमध्ये लुटा बहार-ए-काश्मीरची मजा, एप्रिल महिन्यात IRCTC ची भन्नाट ट्रिप! खर्च किती?

WABetaInfo, व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेट्स आणि नवीन फीचर्सची माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप वेब क्लायंटसह नवीन साइडबार वैशिष्ट्याची चाचणी सुरु केली आहे. वापरकर्त्यांना या साइडबारसह अॅपच्या विविध भागांमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी सोपे पर्याय मिळणार आहे.

1. बीटा वापरकर्त्यांसाठी साइडबार

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यावर नवीन साइडबार अॅपमध्ये ब्राउझिंग करणे सोपे होणार असून एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणे शक्य होणार आहे. यामध्ये स्क्रीनच्या डाव्या बाजूला सर्व पर्याय एकत्र दिसतील. यामध्ये काही बीटा वापरकर्त्यांना नवीन अपडेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे तर याची चाचणी पूर्ण झाल्यानंतर इतर युजर्सना वापरता येईल.

WhatsApp New Features Update: WhatsApp gives Chatting and status-uploading related feature
AC Buying : एसी विकत घेण्याचा विचार करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

साइडबार व्यतिरिक्त प्लॅटफॉर्म कंपनी (Company) अपग्रेड केलेल्या नोट्सची चाचणी करत आहे. नवीन फीचरमध्ये वापरकर्त्यांना कॉन्टकमध्ये नोट्स अटॅच करता येणार आहे. याचे देखील बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केल्यानंतर रोलआइट होईल. नुकतेच एंड्रॉइंड आणि iOS अॅप्समध्ये याचे रीडिजाइन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com