AC Buying : एसी विकत घेण्याचा विचार करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

Keep These Things in Mind While Buying Ac : मार्च महिना संपल्यापासून उकाडा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. या गरमीपासून वाचण्यासाठी आपण घरात एसी विकत घेण्याचा विचार करतो.
AC Buying Tips, Keep These Things in Mind While Buying Ac
AC Buying Tips, Keep These Things in Mind While Buying Ac Saam Tv
Published On

AC Buying Tips :

मार्च महिना संपल्यापासून उकाडा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. या गरमीपासून वाचण्यासाठी आपण घरात एसी विकत घेण्याचा विचार करतो.

फॅन आणि कूलरपेक्षाही एसी शरीराला अधिक चांगला गारवा देते. एसी खरेदी करण्यासोबतच त्याचा अधिक वापर केल्याने वीजबिलही अधिक प्रमाणात येते. अशावेळी आपल्याला असा एसी निवडायला हवा. ज्यामुळे वीज बिल कमी येईल. त्यासाठी इन्व्हर्टसह स्मार्ट एसी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

1. इन्व्हर्टर एसी का?

इन्व्हर्टर एसी सामान्य एसी पेक्षा अधिक कार्यक्षम मानला जातो. कारण तो अधिक कूलिंगसह कमी वीज वापरतो. बहुतेक स्मार्ट एसी इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह येतात. जर तुम्हाला कमी वीज बिल हवे असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा इन्व्हर्टर एसी घ्या. इन्व्हर्टर एसी खोलीच्या तापमानानुसार कुलिंग करते.

AC Buying Tips, Keep These Things in Mind While Buying Ac
Google वर सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? कंपनीचा मोठा निर्णय

2. स्मार्ट एसी

स्मार्ट एसीचे अनेक फायदे (Benefits) आहेत. हा एसी स्मार्टफोनवरुन नियंत्रित केला जाऊ शकतो. यामध्ये स्मार्ट डायग्नोसिस, मेंटेनन्स आणि इतर अनेक गोष्टींची माहिती दिलेली असते. स्मार्ट एसीमध्ये तुम्ही लांबूनही त्याला नियंत्रित करु शकता. म्हणजे चुकून एसी बंद करायचा विसरलात तर स्मार्टफोनवरुन (Smartphone) बंद करता येईल.

3. एसी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

  • एसी कूलिंग आणि हीटिंग या दोन्ही स्वरुपात मिळते. त्यासाठी एसी खरेदी करताना तो खोलीच्या आकारानुसार खरेदी करा.

  • कॉपर कॉइलचा एसी खरेदी करणे अधिक चांगले असते. हा खूप काळ टिकतो म्हणून कॉपर कॉइल एसी खरेदी करा.

  • नवीन एसी खरेदी करताना आपण बीईई रेटिंग पाहणे आवश्यक आहे. ५ स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करणे केव्हाही चांगले. यामुळे विजेची अधिक बचत होते.

  • विंडो एसी ऐवजी तुम्ही स्प्लिट एसी खरेदी करु शकता. यामध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत. स्प्लिट एसीची किंमत (Price) अधिक जास्त आहे. स्प्लिट एसी कोणत्याही खोलीत सहज बसवता येतो.

  • एसी खरेदी करताना त्यावर एअर फिल्टर आहे की, नाही हे तपासा. अनेक एसीमध्ये गंध फिल्टर आणि अँटी-बॅक्टेरियल फिल्टर देखील असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com