Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Kanya Pujan Rules: कन्या पूजा करताना लहान मुलींना घरी भोजनासाठी बोलावले जाते. त्यांची पूजा केली जाते. यामध्ये मुलींचे वय माहित असणं गरजेचं असतं. त्याला एक अर्थ असतो. याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
Navratri Kanya Pujan
Navratri Kanya Pujansaam tv
Published On: 

नवरात्री हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस उपवास केल्यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजन करण्याची पंरपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, लहान मुलींमध्ये देवी दुर्गेचं स्वरूप पाहिलं जातं. त्यामुळे कन्या पूजन केल्यावर देवाची आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. मात्र, कन्या पूजन करताना मुलींचं वय किती असावं आणि प्रत्येक वयाच्या कन्येचं काय महत्त्व आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं?

धार्मिक मान्यतेनुसार, कन्या पूजनासाठी २ ते १० वर्षे वयोगटातल्या मुलींची निवड केली जाते. प्रत्येक वयाच्या कन्येला देवीचं वेगवेगळं स्वरूप मानलं जातं. त्यानुसार त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

Navratri Kanya Pujan
India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

कोणत्या वयाच्या कन्येला कोणतं स्वरूप मानलं जातं?

  • २ वर्षांची कन्या - कुमारी - दुःख आणि दारिद्र्य लांब होऊन आयुष्य, बळ आणि समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

  • ३ वर्षांची कन्या - त्रिमूर्ति - धनधान्य आणि कुटुंबातल्या भरभराटीसाठी पूजा केली जाते.

  • ४ वर्षांची कन्या - कल्याणी - विद्या, कार्यात यश आणि सुखप्राप्तीसाठी पूजन केलं जातं.

  • ५ वर्षांची कन्या - रोहिणी - आरोग्य आणि रोगमुक्तीसाठी पूजा करण्याची मान्यता आहे.

  • ६ वर्षांची कन्या - कालिका - शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी पूजन केलं जातं.

Navratri Kanya Pujan
Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
  • ७ वर्षांची कन्या - चंडिका - धन आणि ऐश्वर्यवृद्धीसाठी पूजा केली जाते.

  • ८ वर्षांची कन्या - शांभवी - दु:ख दूर होऊन संकटांवर मात करण्यासाठी पूजन केलं जातं.

  • ९ वर्षांची कन्या - दुर्गा - शुत्रू आणि अडचणींपासून संरक्षण मिळावं, अशी श्रद्धा आहे.

  • १० वर्षांची कन्या - सुभद्रा - मनोकामना पूर्ण होण्यासाठी पूजन केलं जातं.

कन्या पूजनात बालकाची पूजा का करतात?

कन्या पूजनाच्या वेळी एका लहान बालकाला भोजन देऊन त्याची पूजा करण्याचीही परंपरा आहे. या बालकाला भैरवातं प्रतीक मानलं जातं. कन्यांना भोजन देणं, त्यांचा आदर करणं आणि त्यांना भेटवस्तू देणं हा या विधीचा महत्त्वाचा भाग आहे.नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजन केलं जातं. आपल्या कुटुंबातल्या परंपरा आणि धार्मिक विधींनुसार पूजेची वेळ ठरवली जाते.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com