5 Signs Your Partner Is Marriage Material : कोई कैसे उन्हें ये समझाए, सजनिया के मन में अभी इंकार है, जाने बलमा घोडे पे क्यों सवार है...!
चेहऱ्यावर जरा दाढी-मिशी फुटली की, असंख्य मुलांच्या मनात लग्नाचे वारे वाहू लागतात. कॉलेज किंवा ऑफिसमध्ये ते आपल्याला हवी तशी जोडीदार शोधण्याचा मागावर असतात.
हल्लीची तरुण पिढी हवी तशी मुलगी शोधण्यासाठी डेटिंग अॅप्सचा सर्रास वापर करताना दिसून येते. त्यातही त्यांच्या अपेक्षांची भली मोठी लिस्टही. कुणी सोशल मीडियाचा वापर करतं तर कुणी आपल्याच ओळखीची आहे का यात व्यस्त असतं.
परंतु, असंख्य तरुणींच्या मनात देखील हा प्रश्न पडतो की, मुलांना नेमक्या कशा मुली अधिक जवळच्या वाटतात. म्हणून त्या त्यांच्या जवळच्या मित्राला (Friend) किंवा ओळखीच्या व्यक्तीला सतत काहीबाही प्रश्न विचारतात. त्यातच त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात.
काही मुलींना (Women) असे वाटते की, मुलांना लांब केस असणारी, गोरा रंग, नाजूक सडपातळ, सुंदर असा आवाज, सतत तिलाच बघावं असं वाटणं, शांत स्वभाव, सतत माझाचं विचार करणारी, बुद्धिमान, शिकलेली पण निदान डॉक्टर (Doctor) तरी असावी... एकुलती एक, नसेल काही तर शेती तरी असावी, तिच्या घरी एक दोन ऑडी किंवा फॉरचूनर असावी. अशाप्रकारच्या मुली अधिक आवडतात.
पण खरेतर हा निव्वळ मुलींचा गैरसमज असतो. सध्याच्या मुलांना मुलीला पाहिल्यानंतर फक्त एकच इच्छा होते, काही नाही पण निदान तिने मला, माझ्या कुटुंबाला (Family) सांभाळायला हवे. अर्थात मुलींना देखील अगदीच श्रीमंत नवरा मुलगा नको असतो. त्यांने फक्त तिला समजून घ्यावं, तिच्या मनाला, तिच्या जबाबदारीला आणि मुळात तिला कोणती गोष्ट करताना बंधन नसावं अशी तिची इच्छा असते.
हा अपेक्षांचा डोंगर मांडताना खरेतर सध्या मुलांना मुलगी व मुलींना मुलगाच मिळेनासा झाला आहे. ९० टक्के मुलांना फक्त जोडीदारांने त्याच्यामागे सतत किट किट करु नये. त्याच्या मनातलं कळावं, आजारपणात माझ्या जवळ रहावं. कधी साध्या गोष्टीसाठी नाराजही व्हावं. खुश ही लवकर व्हावं. अशा खूप साध्या अपेक्षा असतात.
कमी पैशात पण तिने समाधानी राहावं पण तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी. पण तिने मला आयुष्यभर साथ द्यावी. शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकत्र राहावं इतकीच माफक अपेक्षा हल्लीच्या तरुण पिढीची आहे.
परंतु, हल्लीच्या जगात त्यांच्या समोर अपेक्षांचा डोंगर खूप उंचावर गेला. एकतर नोकरी मिळना. ज्याला वागायचं बोलायचं कळत नाही तो पोरगी घेऊन फिरतो. हा शाहणा त्याला बघून रात्री घरात येऊन रडतो.
खरेतर यात मुलींनी देखील थोडं फार समजून घ्यावं. लग्न करताना मुलींनी देखील जास्त अपेक्षा मांडून नये. संसार हा दोघांचा मिळून असतो. बैलगाडाच्या चाकासारखा एक चाक थांबल तर दुसऱ्याने भार उचलावा... त्यात मुलींनीही कुठेतरी जुळवून घेणे, समाधानाने आपल्या जोडीदारासोबत राहाणे. मग बास झालं की, तो तुम्हालाही राणीसारखं का नाही ठेवणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.