Right Age to Get Married : 'सोळाव वरीस धोक्याच' या गाण्याचे बोल आणि वयात आलेल्या प्रत्येक तरुणांच्या घरची परिस्थिती सगळ्यांच माहीत असेल. लग्नाच वय जसं जसं जवळ येऊ लागते तसं तसं प्रत्येक तरुणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात.
आपला होणारा जोडीदार कसा असेल याबाबत प्रत्येक वयात आलेली मुलं स्वप्न पाहू लागतात. करिअर, शिक्षण बनवण्याच्या नादात मुलीची बावीशी उलटली जाते. अशावेळी प्रत्येक नातेवाईकांचे, शेजारी-पाजाऱ्यांचे हमखास आपल्या घरी फोन खणखणतात.
त्यामुळे घरी देखील याविषयी चर्चा सुरु होते. तर मुलांचे 26 वय होऊन गेले की घरचे लग्न कर म्हणून मागे लागतात.
पण लग्नासाठी नेमके योग्य वय काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. याचे उत्तर तसे तर मिळणे कठीण आहे. कारण लग्न करणं अथवा न करणे ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. पण आपल्याकडे लग्न करण्यापूर्वी प्रत्येकाला हल्ली व्यवस्थित सेटल व्हायचं असतं.
त्यामुळे बऱ्याचदा लग्नाचं वय निघून गेलं असंही म्हटलं जाते. त्यामुळेच आपण जाणून घेऊया नक्की सर्वानुमते लग्नाचे योग्य वय काय आहे ?
सर्व्हेनुसार लग्नाचे वय
युनिव्हर्सिटी ऑफ उताहच्या प्रोफेसर निकोसल एच. वेल्फिंगर द्वारे करण्यात आलेल्या एका शोधानुसार लग्नाचे योग्य वय हे सर्व्हेमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे साधारण 28 ते 32 इतके असायला हवे. हे वय लग्नासाठी योग्य देखील समजले जाते.
भारतात साधरणत: 20-25 वयामध्ये लग्न होणे हे योग्य वय मानण्यात येते तर आजकालच्या ट्रेंडनुसार 30-35 हे लग्नाचे वय झाले आहे. काही जण तर अगदी चाळीशीमध्येही लग्न करतात तर काही जण लग्न न करताच तसेच राहणे योग्य समजतात.
लग्नासाठी योग्य वयाचा बायोलॉजिकल तर्क
लग्नासाठी दोघांमध्ये असणाऱ्या वयाचा फरक हा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक या तिन्ही पातळीवर ठरलेला असतो. त्यामुळे वय वाढण्याचे तोटे पुरुषांपेक्षा महिलांना अधिक जाणवत असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे बऱ्याचदा मुलांचे लग्नाचे वय 28 आणि मुलीचे लग्नाचे योग्य वय हे 25 असावे असे म्हटले जाते. हे वय केवळ संसार करण्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी देखील महत्त्वाचे मानले जाते. पण व्यक्तिपरत्वे या गोष्टी अर्थातच बदलत जातात.
तज्ज्ञांनुसार लग्नाचे योग्य वय
गायनॉकॉलॉजिस्ट श्वेता पाटील यांनी सांगितले की, लग्नासाठी मुलींचे योग्य वय हे 22 ते 25 दरम्यान असायला हवे. या वयात लग्न केल्यास, तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
सर्वात चांगली बाब म्हणजे दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे करिअरसोबतच आपल्याला नात्याची विण देखील घट्ट करता येते. तसेच दोघांचेही आपल्या करिअरसाठी अनेक प्रयत्न आणि स्वप्नंही असतात.
त्यामुळे दोघे एकत्र मिळून ही स्वप्नं पूर्ण करू शकतात. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना जन्म देताना तुम्ही त्यांना व्यवस्थित वेळ देऊ शकता. कारण योग्य वयात हा निर्णय घेतला तर तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये तुमचे वयही लपवता येईल व आरोग्यानेही तुम्ही फिट असाल. तसेच तिशीच्या आतमध्ये मुलांना जन्म देताना जास्त त्रास होत नाही.
या वयात अजिबात लग्न करू नये
वयाच्या 13 – 18 या वयामध्ये लग्न करू नका. हे ना विज्ञानानुसार योग्य आहे ना प्रशासनानुसार. साधारण 18 वर्षानंतरच बुद्धी आणि शरीर हे दोन्ही परिपक्व होत असतं. त्यामुळे त्यानंतरच लग्नाचा विचार करणं योग्य आहे. तसंच तुम्ही जर चाळीशी पार केली असेल तरीही लग्नाचा विचार करणं तुमच्यासाठी योग्य नाही. हे शारीरिकदृष्ट्या सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.