Chulivarche Jevan : चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते?

चुलीवर बनवलेल्या पिठल भाकरीची चव काही औरचं...
Chulivarche Jevan
Chulivarche JevanSaam Tv
Published On

Chulivarche Jevan : हल्लीच्या तरुण मंडळींना किंवा खवय्यांना चवदार व चमचमीत खाद्यपदार्थ लागते. बदलेल्या जीवनशैलीनुसार माणसांने बरीच प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान व विकसित गोष्टी आणून त्यांने चुलीसारख्या गोष्टींचे गॅसमध्ये रुपातंर केले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा पर्याय माणसांने शोधून काढला आहे.

परंतु, गेल्या काही काळापासून शहरातील लोकांना गावाकडच्या जेवणाची चव आवडू लागली आहे. चुलीवर बनवलेल्या पिठल भाकरीची चव काही औरचं... झणझणीत रस्सा व भातासोबत शहरातील माणसं चवीने या गोष्टी खातात. मुंबईसारख्या शहरातील वातावरण देखील बदलेले दिसत आहे. निसर्ग, शांतता व चुलीवरच्या जेवणाची चव चाखण्यासाठी माणूस सुट्टीच्या दिवशी गावाकडे परतताना दिसत आहे.

Chulivarche Jevan
Partner who works in the IT sector : हल्लीच्या तरुणींना IT क्षेत्रात काम करणाऱ्या जोडीदार का हवा आहे ?

मुंबईमध्ये सध्या ढाबा व जागोजागी चुलीवर बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नवनवीन हॉटेल्स किंवा अस्सल चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला लोक लांबच्या लांब रांगा लावताना दिसून येतात पण याचे नेमके कारण काय ? चुलीवरचे जेवण इतके रुचकर का लागते? गावच्या जेवणाची व शहराकडच्या जेवणात इतका फरक का असतो. जाणून घेऊया.

चुलीवर जेवण बनवताना लागणारे घटक म्हणजे कच्चा माल, मसाला, फोडणीचे साहित्य, तेल, तूप आणि मुख्य म्हणजे पाणी. गावी चुलीवर बनवले जाणारे पदार्थ हे शेतात एकतर पिकवलेले व ताजे असतात. याला साठवण्यासाठी शहरात असणाऱ्या सोयींचा वापर केला जातं नाही. गहू तांदूळ आणि इतर कडधान्याचे ही तेच , शेतात पिकलेला गहू बाजारात पाठवण्याआधी आपल्याला पुरेल असा बाजूला काढून ठेवला जातो , म्हणजे मोठ्या गोडाऊन मध्ये साठवण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशके त्यात मिळवली जात नाहीत.

Chulivarche Jevan
Chulivarche JevanCanva

दूध , दही हे फार क्वचितच दुकानातून विकत आणले जाते , दुधावरची साय कढवून त्याचे तूप बनवले जाते . उन्हाळ्यात अंगणात पापड, कुरडया , मिरच्या , मसाले वाळवले जातात आणि मसाल्याच्या गिरणीत हवे तसे बारीक करून आणले जाते. आणि सगळ्यात महत्वाचे ज्यामुळे अन्नाला अप्रतिम अशी चव मिळते ते म्हणजे गावी मिळणारे पाणी.

शहरात वेगवेगळी रसायनांचा वापर करुन पाणी शुध्द केले जाते. गावी वापरले जाणाऱ्या पाण्याची चव ही मुळात वेगळे असते. एकतर विहिरीचे किंवा नदीतल्या स्वच्छ पाण्याचा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे यात मोठ्या प्रमाणात खनिज आणि क्षार असतात जे सगळ्या जेवणाला एक अफलातून चव देते. जेवणाची चव वाढवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Jack Daniels bourbon whiskey
Jack Daniels bourbon whiskeycanva

तसेच अमेरिकेची सगळ्यात फेमस Jack Daniels bourbon व्हिस्की ज्या गावात बनवली जाते त्यात तेथील नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याचा वापर केला जातो. तिथल्या मास्टर ब्रुअर्सचे म्हणणे असे आहे की, यात दुसरे कोणतेही पाणी वापरले तर अर्थात व्हिस्कीची चव बदलेले.

तर असे म्हणणे वावगं ठरणारं नाही की, गावी बनवले जाणारे जेवण हे तिथले पाणी, माती, वातावरण व कच्चा माल यांवर अंवलबून असते. तिथे फक्त चुल कारणीभूत नसून त्यात पडणारे घटक खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी एकदा घरात चुलीवर जेवण बनवून पहा किंवा त्यात पडणारे योग्य घटक समप्रमाणात वापरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com