Married Women Search: नवविवाहित महिला Google वर काय सर्च करतात? समजल्यावर तुम्हाला बसेल धक्का

What do Married Women Search the Most on Google: लोकं गुगलवर काय सर्च करतात याबाबत एक सर्व्हक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये विवाहित महिला एकंदरीत गुगलवर काय सर्च करतात हे पाहूयात.
Married Women Search
Married Women Searchsaam tv
Published On

आपल्याला काही अडलं की आपण लगेच त्याचं उत्तर शोधण्यासाठी गुगलवर सर्च करतो. लहान मुलं, महिला तसंच पुरूष गुगलवर विविध गोष्टी शोधतात. प्रत्येकजण आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी गुगलची मदत घेतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात?

Married Women Search
Christmas Gifts: ख्रिसमसनिमित्त द्या 'या' खास भेटवस्तू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे होतील खूश

संशोधनातून धक्कादायक बाब समोर

लोकं गुगलवर काय सर्च करतात याबाबत एक सर्व्हक्षण करण्यात आलं होतं. या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रश्नाच्या निकालाने लोकांना धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया गुगलवर विवाहित महिला काय शोधतात.

Married Women Search
Vastu Tips: चुकूनही घरामध्ये 'या' ठिकाणी पैसे ठेऊ नका, रातोरात होऊ शकता कंगाल, लक्ष्मी होईल नाराज

विवाहित महिला त्यांच्या पतीबद्दल काय सर्च करतात?

गुगलच्या माहितीनुसार, विवाहित महिलांनी सर्वाधिक सर्च केलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पतीला काय आवडतं. आपल्या पतीच्या आवडी-निवडी काय आहेत, त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, याची माहिती कशी घ्यायची याबाबत महिला गुगलवर सर्च करतात.

Married Women Search
Stomach cancer : अँटासिड घेतल्याने पोटाचा कर्करोग टाळता येतो? पोटाच्या कॅन्सरबाबत असलेल्या गैरसमजुतीवर तज्ज्ञांनी दिलं उत्तर

त्याचप्रमाणे गुगलवर हा प्रश्नही अनेकदा विचारला जातो की, आपल्या पतीचे मन कसं जिंकायचं? पतीला आनंदित कसं ठेवायचं याबाबत देखील विवाहित महिला गुगल सर्च करतात. अजून एक धक्कादायक खुलासा म्हणजे, विवाहित महिलांनी गुगलला आपल्या पतीला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं असंही सर्च केलं आहे. याशिवाय मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं याबाबत देखील महिलांना सर्च केलं आहे.

Married Women Search
Cancer vaccine: रशियाची लस नेमक्या कोणत्या कॅन्सरवर करणार उपचार? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

अजून काय सर्च करतात महिला?

आम्ही तुम्हाला सांगितलेल्या प्रश्नांशिवाय काही प्रश्न आहेत जे महिला लग्नानंतर गुगलला विचारतात. स्त्रियांना हे जाणून घ्यायचं असतं की, त्यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं रूळलं पाहिजे? नव्या कुटुंबाचा, सासरचा भाग कसा बनू शकतो. याशिवाय, तिला तिच्या कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार हे देखील नवविवाहित महिलांना जाणून घ्यायचं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com