Stomach cancer : अँटासिड घेतल्याने पोटाचा कर्करोग टाळता येतो? पोटाच्या कॅन्सरबाबत असलेल्या गैरसमजुतीवर तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Stomach Cancer Symptoms and Causes : पोटाचा कर्करोग हा भारतातील आणि जगभरातील कर्करोगाचा पाचवा सर्वात सामान्य प्रकार आहे. वेळीच याचं निदान होणं गरजेचं असतं
Stomach cancer Symptoms and causes
Stomach CancerSaam Tv
Published On

पोटाच्या कर्करोगाला गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो तुमच्या पोटात असलेल्या पेशींमध्ये असतो. पोटाचा कर्करोग हा गंभीर आणि जीवघेणा आहे कारण तो तुमच्या पोटाच्या कोणत्याही भागावर नकारात्मक परिणाम करू शकतो. पोटाच्या कर्करोगाची नेमके कारण अद्याप अज्ञात आहे, त्यामुळे त्याचे वेळीच निदान होणे कठीण आहे. तथापि, काही जोखीम घटक या विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे निदान होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकतात.

नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सचे पोट विकार तज्ज्ञ, हेपॅटोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिस्ट, डॉ दीपक अहिरे म्हणाले की, जोखीम घटकांमध्ये सिगारेट ओढणं, आहारातील चूकीच्या सवयी, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, विशेषत पोटाचा कर्करोग, हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाचा संसर्ग आणि काही अनुवंशिक परिस्थिती यांचा समावेश असू शकतो. पोटाचा कर्करोग सहसा सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येत नाही कारण त्याची लक्षणं चटकन आढळून येत नाहीत.

Stomach cancer Symptoms and causes
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सर होतो? डॉक्टरांनी दिलं तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर!

प्रगत एंडोस्कोपी द्वारे पोटाचा कर्करोगाचे वेळीच निदान करणे शक्य होते. एंडोस्कोपी एच पाइलोरी संसर्गाचे निदान करण्यात मदत करते जे पोटाच्या कॅन्सरसाठी देखील जबाबदार आहे. जसे अचानक वजन कमी होणे, सतत पोटदुखी, गिळण्यात अडचण, मळमळ आणि उलट्या यासारखे लक्षण आढळून येतात

Stomach cancer Symptoms and causes
Breast cancer : २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर धोका? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

पोटाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमजूती आणि वास्तविकता

गैरसमज: पोटाचे सर्व कर्करोग सारखेच असतात.

वास्तविकता: पोटाचे सर्व कर्करोग सारखे नसतात. हा एकच आजार नाही. पोटाच्या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत आणि सर्वात सामान्य म्हणजे एडेनोकार्सिनोमा. हा विशिष्ट प्रकारचा कर्करोग पोटातील श्लेष्मा निर्माण करणाऱ्या पेशींमध्ये विकसित होतो. पोटाच्या कर्करोगाच्या इतर प्रकारांमध्ये लिम्फोमा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स्ट्रोमल ट्यूमर (जीआयएसटी), आणि कार्सिनॉइड ट्यूमर यांचा समावेश होतो. पोटाच्या कर्करोगाचा प्रत्येक प्रकार वेगळा असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींची आवश्यकता भासू शकते.

Stomach cancer Symptoms and causes
Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

गैरसमज: जर तुम्हाला पोटाचा कर्करोग झाला तर त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.

वास्तविकता: पोटाच्या कर्करोगाचे निदान झालेल्यांसाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार पर्याय नाही. कर्करोगाच्या स्थानावर आणि टप्प्यानुसार त्याचे उपचार अवलंबून असतात आणि व्यक्तीनुसार उपचार बदलू शकतात. इतर उपचार पर्यायांमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा समावेश असू शकतो. काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमर कमी करण्यासाठी रुग्णांना केमो किंवा रेडिएशन थेरेपीचा सल्ला दिला जातो.

गैरसमज: नियमितपणे अँटासिड घेतल्याने पोटाचा कर्करोग टाळता येतो

वास्तविकता: अँटासिड्स केवळ ऍसिड रिफ्लक्स किंवा अपचनाच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात परंतु पोटाचा कर्करोग संरक्षण करत नाही. धूम्रपान, अल्कोहोल आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यासारख्या जीवनशैलीतील विविध घटकांमुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि धूम्रपान किंवा मद्यपान यासारख्या हानिकारक गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

Stomach cancer Symptoms and causes
Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

गैरसमज: जर तुम्ही निरोगी असाल आणि धूम्रपान करत नसाल तर तुम्हाला पोटाचा कर्करोग होणार नाही.

वास्तविकता: निरोगी राहणे आणि धूम्रपान न केल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते, तरीही तो कोणालाही होऊ शकतो. आनुवंशिकता, आरोग्य स्थिती, आहार, आणि एच. पायलोरी संसर्ग यासारख्या काही घटकांमुळे तुम्हाला या कर्करोगाचा धोका होऊ शकतो. व्यक्तींना नियमित तपासणी आणि आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com