
ख्रिसमस आणि नवीन वर्षात मुलांना आपण नवनवीन भेटवस्तू देत असतो. आता ख्रिसमस हा सण तोंडावर आला आहे. सगळ्यांची नवीन वर्षांसाठीची तयारी सुरू आहे. त्यात आपण कोणाला कोणत्या भेटवस्तू द्यायच्या असा विचार करत असतो. तसचं लहान मुलांना सुद्धा गिफ्टची फार उत्सुकता असते. मग त्यांच्यासाठी अशा काही भेटवस्तु आपण देऊ शकतो की, त्याचा वापर त्यांना रोजच्या जिवनात होईल. तुम्ही लहान मुलांव्यतिरिक्त मोठ्यांनाही या भेटवस्तू देऊ शकता.
स्नॅक्स बकेट
तुम्ही असे स्नॅक्स बकेट भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्यात ड्रायफ्रुट्स असतील. जे लवकर खराब होणार नाहीत शिवाय काही पदार्थांमध्ये सुद्धा मिसळून तुम्ही नियमीत त्यांचे सेवन करू शकता. त्यात बिस्किटे, चॉकलेट, टॉफी, कप केक अशा वस्तू असतात.
ख्रिसमस कुकीज
ख्रिसमसला तुम्ही गिफ्ट कुकीज गिफ्ट करू शकता. सध्या हे गिफ्ट देण्याचा ट्रेंड सुरू आहेत. या कुकीज चहा किंवा कॉफीसोबतही खाता येतात. शिवाय हे बिस्कीट दिर्घकाळ टिकतात.
फळांची टोपली
सण असो वा सोहळा फळांचे महत्व सारखेच असणार आहे. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना फळ भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्याने बाहेरचे खाणे मुलं टाळतील. त्यात तुम्ही विविध आकारांच्या टोपल्यांचा समावेश करू शकता.
ब्रेकफास्ट बॉक्स
जर तुम्हाला काही वेगळी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही नाश्त्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स आणि रेडी टू इट फूड देऊ शकता. हे साहित्य तुम्ही वेगवेगळे घेवून टिफीन बॉक्समध्ये पॅक करून सुद्धा देऊ शकता. यात पोहे,ओट्स,मॅगी, इडली-डोसा मिक्स बॅटर देऊ शकता.
चॉकलेट-टॉफी
तुमच्या मित्रांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या फ्लेवरची चॉकलेट्स आणि ऑर्डर करून तुम्ही खास बॉक्स तयार करू शकता. यामध्ये ऑरेंज कॅंडी, चिंच, आंबा, चॉकलेट, व्हॅनिला इत्यादी फ्लेवरची चॉकलेट्स आणि टॉफी घेता येतात.
मिक्स ज्युस
तुम्ही ट्रेट्रापॅक केलेले वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ज्युस देखील खरेदी करू शकता, गिफ्ट बॉक्स बनवू शकता आणि तुमच्या मित्रांना भेट देऊ शकता.
Written By: Sakshi Jadhav