Onion Uttapam Recipe
One Pot Mealyandex

One Pot Meal: टिफीनसाठी ट्राय करा 'ही' चमचमीत चविष्ट रेसिपी; झटपट होईल तयार

Onion Uttapam Recipe: थंडीत लवकर उठायचा कंटाळा येतो? मग टिफीन उशीर होतो? मग तुम्ही बाहेर जेवता. या कारणाने नक्कीच तुमची तब्बेत बिघडेल.
Published on

सध्या थंडीचे तापमान खूप वाढलयं. त्यामुळे सकाळी लवकर उठून कामावर जाणाऱ्या महिलांची खूप दमछाक होते. अशा वातावरणात लवकर उठून टिफीन तयार करणे फारच कठीण झालं आहे. या प्रश्नांचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी एकदम सोपी आणि सहज करता येणारी रेसिपी आणली आहे. ती म्हणजे ओनियन उत्तप्पा ही रेसिपी तुम्ही १० मिनिटांत तयार करू शकता. शिवाय त्यातून तुम्हाला अनेक पौष्टीक घटक सुद्धा सहज मिळतील. चला तर जाणून घेऊया झटपट रेसिपी.

ओनियन उत्तप्पा बनवण्याचे साहित्य

2 कप डोश्याचे पीठ

1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)

1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

2 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)

1 टेबलस्पून जिरे

1/2 टीस्पून हळद

चवीनुसार मीठ

थोडं तेल

Onion Uttapam Recipe
Wheat Flour: तुम्ही उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवता का? मग काळजी घ्या, अन्यथा 'या' समस्या तुम्हाला आयुष्यभर सतावतील

ओनियन उत्तप्पा बनवण्याची कृती

पीठ तयार करणे

एका भांड्यात डोश्याचे पीठ घ्या. त्यात हळद, जिरे, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि मीठ अ‍ॅड करा. आवश्यक असल्यास थोडं पाणी अ‍ॅड करून पीठ गाठीशिवाय मिक्स करा. पीठ डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर ठेवा.

तवा गरम करणे

तवा मध्यम आचेवर गरम करा आणि थोडं तेल पसरवा.

उत्तप्पा तयार करणे

एका मोठ्या पेल्याने किंवा पळीने तव्यावर पीठ ठेवून हलक्या हाताने गोलसर पसरवा. (लेयर जाडसर ठेवायची आहे). वरून थोडं तेल शिंपडा आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवा. एका बाजूने हलक्या सोनेरी रंगाचा झाल्यावर पलटून दुसऱ्या बाजूने शिजवा.

ऑनियन उत्तप्पा खाण्याचे पौष्टिक फायदे

कांद्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हृदयासाठी उपयुक्त ठरते. तांदूळ आणि उडीद डाळीचे पीठ असल्याने प्रथिने आणि फायबर मिळतात.पचनासाठी उपयुक्त ठरते. हिरवी मिरची पचन सुधारते आणि मेटाबॉलिझमला चालना देते. कोथिंबीरमध्ये जीवनसत्त्वे A आणि C भरपूर प्रमाणात असतात.

तेल कमी असल्याने उत्तप्पा हलका आणि पचायला सोपा असतो. या रेसिपीमुळे चविष्ट आणि पोषणयुक्त न्याहारी किंवा जेवण मिळू शकते.


Written By: Sakshi Jadhav

Onion Uttapam Recipe
Dry Cough: थंडीमध्ये कोरडा खोकला तुम्हाला हैराण करतोय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल लगेच आराम...
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com