ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
1/4 बटर,1/4 दही, अर्धा कप साखर,६ चमचे कोमट दूध, 3/4 मैदा 1/2 बेकिंग पावडर, 1/2 बेकिंग सोडा 4 चमचे फ्रुट जॅम
कुकरमध्ये मिठाचा थर तयार करा आणि कुकर १० मिनिटे गरम करण्साठी ठेवा.
एका गोल भांड्यात बटर लावून त्यावर बटरपेपर लावा.
एका भांड्यात साखर आणि बटर चांगले फेटून घ्या. या मिश्रणात दही आणि दूध अॅड करा आणि पुन्हा फेटून घ्या.
या मिश्रणात बेकिंग पावडर,बेकिंग सोडा आणि मैदा अॅड करुन चांगले मिक्स करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेले मिश्रण बटरपेपर लावलेल्या भांड्यात अॅड करा.आणि कुकरमध्ये आरामात ठेवा. यानंतर कुकर मंद आचेवर अर्ध्या तासासाठी ठेवा.
केक नीट शिजला आहे की नाही हे चाकू किंवा टूथ पिकच्या साहाय्याने तपासत राहा.
अर्ध्यातासानंतर केकला थंड होऊ द्या. त्यावर जॅमचा थर लावा आणि ड्राय फ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.
NEXT: रोज सकाळी खा तुळशीचं पान,होतील 'हे' आर्श्चयकारक फायदे