Vivah Muhurta 2026: यंदा कर्तव्य आहे! नोव्हेंबरमध्ये उडवा लग्नाचा बार, जाणून लग्नाचे शुभ मुर्हूत

November Wedding Dates 2026 : नोव्हेंबर २०२६ मध्ये लग्नाचे चार शुभ मुहूर्त आहेत. जाणून घ्या शुभ वेळा आणि चातुर्मास समाप्तीची तारीख.
Vivah Muhurta 2026
Vivah Muhurta 2026saam tv
Published On: 

दिवाळी संपली की अनेक घरांमध्ये लग्नाची तयारी सुरू होते. कोणत्या दिवशी लग्न करायचे, शुभ मुहूर्त कोणता आणि चातुर्मास कधी संपणार, असे प्रश्न अनेकांना पडतात. नोव्हेंबर २०२६ मध्ये लग्नाचे नियोजन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कालनिर्णयाच्या विवाह मुहूर्त यादीनुसार, या महिन्यात विवाहासाठी चार प्रमुख शुभ तारखा देण्यात आल्या आहेत. चला तर मग, या तारखा आणि मुहूर्त जाणून घेऊया.

नोव्हेंबर 2026 मधील लग्नाचे 4 शुभ मुहूर्त

कालनिर्णयच्या 2026 च्या विवाह मुहूर्त यादीनुसार, नोव्हेंबर महिन्यात पुढील तारखा विवाहासाठी शुभ मानण्यात आल्या आहेत.

1. २१ नोव्हेंबर २०२६, शनिवार

  • शुभ वेळ : सकाळी ६:४४ ते मध्यरात्री १२:०८

  • तिथी : शुक्ल द्वादशी

  • नक्षत्र : रेवती

2. २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार

  • शुभ वेळ : रात्री ११:२५ ते २५ नोव्हेंबर सकाळी ६:४७

  • तिथी : कृष्ण प्रतिपदा

  • नक्षत्र : रोहिणी

Vivah Muhurta 2026
Higher Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! EPFO हायकोर्टाच्या निर्णयांना देणार आव्हान; नेमकं काय घडणार?

3. २५ नोव्हेंबर २०२६, बुधवार

  • शुभ वेळ : सकाळी ६:४७ ते २६ नोव्हेंबर सकाळी ६:४७

  • तिथी : प्रतिपदा आणि द्वितीया

  • नक्षत्र : रोहिणी, मृगशीर्ष

4. २६ नोव्हेंबर २०२६, गुरुवार

  • शुभ वेळ : सकाळी ६:४७ ते सायंकाळी ५:४७

  • तिथी : द्वितीया आणि तृतीया

  • नक्षत्र : मृगशीर्ष

Vivah Muhurta 2026
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाने फसवणूक, प्रशासनाने दिला मोठा इशारा

चातुर्मास कधी संपणार?

धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. यंदा २० नोव्हेंबर २०२६ रोजी देवउठनी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मास समाप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यानंतर तुळशी विवाह पार पडल्यावर विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून लग्नसराईचा उत्साह वाढण्याची शक्यता आहे.

लग्नाची तारीख ठरवताना ही काळजी घ्या!

लग्नाची तारीख ठरवताना फक्त पंचांगातील शुभ दिवस पाहणं पुरेसं नाही. वधू-वरांची जन्मकुंडली, नक्षत्र, तिथी आणि ग्रहस्थिती यांचाही विचार केला जातो. त्यामुळे अंतिम मुहूर्त ठरवण्यापूर्वी स्थानिक गुरुजी किंवा ज्योतिषांचा सल्ला घ्यावा. तसेच शहरानुसार पंचांगातील वेळांमध्ये फरक असू शकतो.

महत्त्वाचे: वरील मुहूर्त कालनिर्णयच्या यादीवर आधारित असून, लग्न निश्चित करण्यापूर्वी स्थानिक पंचांगानुसार वेळेची खात्री करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.