Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाने फसवणूक, प्रशासनाने दिला मोठा इशारा

Ladki Bahin eKYC Fake Message : लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी पुन्हा सुरू झाल्याचे बनावट मेसेज व्हायरल होत आहेत.
ladki bahin yojana
ladki bahin yojana saam tv
Published On: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (e-KYC) प्रोसेस पुन्हा सुरू झाल्याचे मेसेज आणि लिंक व्हायरल होत आहेत. पण हे मेसेज बनावट असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महिलांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नेमका काय आहे व्हायरल मेसेज?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेस पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला जातोय. यासोबतच काही लिंकही शेअर केल्या जातात. या लिंकवर क्लिक करून ईकेवायसी पूर्ण करायला सांगितलं जातंय. पण शासनाकडून अशी कोणतीही नवीन प्रोसेस सुरू करण्यात आलेली नाही.

ladki bahin yojana
EPS-95 Pension : मोठी बातमी! १९ नोव्हेंबरला EPFO ची महत्त्वाची बैठक; पेन्शन नाकारली जाऊ नये म्हणून समोर ठेवल्या 'या' १० मोठ्या मागण्या

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेस परत सुरू झाल्याचा दावा केला जातोय. यासोबतच काही लिंकही शेअर केल्या जातायेत. या लिंकवर क्लिक करून ई-केवायसी पूर्ण करायला सांगितलं जात आहे. मात्र शासनाकडून अशी कोणतीही नवीन प्रोसेस सुरू करण्यात आलेली नाही.

ladki bahin yojana
Post Office Scheme: ५ वर्षांत फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये! पोस्ट ऑफिसची ही योजना ठरतेय सर्वात फायदेशीर

अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

नंदुरबारचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी स्पष्ट केलं की, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात शासनाकडून अजून कोणत्याही नवीन सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर महिलांनी विश्वास ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.