

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दरमहिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता मिळणाऱ्या या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाखो महिलांचं लक्ष हप्त्याकडे लागलं आहे.
राज्यातल्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे इतर योजनांच्या निधीचंही नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्याचं सांगितलं जात आहे.
जर लाभार्थी महिलांच्या खात्यात २८ नोव्हेंबरपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला नाही, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. आजच्या Cabinet Meeting मध्ये हप्त्याच्या निधीबद्दल काही निर्णय होतो का, याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. पण ३००० रुपये एकत्र मिळबाबत सरकारकडून अजून अधिकृत आदेश आलेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रोसेस १६ नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. पण पहिल्याच दिवशी महिलांना Technical Issues ला सामोरं जावं लागलं होतं. आधार क्रमांक टाकल्यानंतर बऱ्याच महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. एकाच वेळी मोठ्या संख्येने महिलांनी लॉगिन केल्यामुळे Server वर जास्त लोड आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वेबसाइटवरचा तांत्रिक समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.