

पेन्शनधारकांसाठी १९ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीआधी पेन्शनधारकांच्या संघटनेने हायर EPS पेन्शनचे क्लेम सतत रिजेक्ट होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. क्लेम नाकारले जाऊ नयेत आणि पेन्शनधारकांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेने १० प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ पेन्शनर्स असोसिएशन्स (NCPA) या संघटनेने EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) बैठकीसाठी एकूण २२ मागण्या मांडल्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या १० मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करा - ४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे.
२. २०२५ चे सर्क्युलर मागे घ्या - १८ जानेवारी 2025 रोजी जारी केलेले सर्क्युलर रद्द करा.
३. कायद्याला प्राधान्य द्या - EPF कायदा आणि EPS-95 नियमांपेक्षा विभागीय सर्क्युलर वरचढ ठरू नयेत.
४. PSU कर्मचाऱ्यांना समान न्याय - सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हायर पेन्शन क्लेममध्ये भेदभाव करू नये.
५. फंडाच्या कमतरतेचे कारण देऊ नका - आर्थिक कारणं देऊन पात्र कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन क्लेम नाकारणं थांबवणं.
६. सर्वांना समान अधिकार - सूटप्राप्त आणि बिगर सूटप्राप्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्यावी.
७. अतिरिक्त योगदानानंतर क्लेम नाकारू नका - व्याजासह अतिरिक्त रक्कम भरल्यानंतरही क्लेम रिजेक्ट करू नयेत.
८. सुनावणीची संधी द्या - क्लेम नाकारण्यापूर्वी त्रुटी सुधारण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ द्यावा.
९. व्याजाच्या बोजातून दिलासा द्या - उशिरा आलेल्या डिमांड लेटरमुळे पेन्शनधारकांवर पडणारा व्याजाचा भार कमी करावा.
१०. पारदर्शकता वाढवा - रखडलेली न्यायालयीन प्रकरणं मागे घेऊन ऑटोमॅटिक क्लेम रिजेक्शन बंद करा.
तर या मागण्यांवर EPFO काय भूमिका घेणार, याकडे देशभरातल्या पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे. त्यासोबत हायर EPS पेन्शनचे प्रलंबित अर्ज, क्लेम रिजेक्शन आणि सूटप्राप्त संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.