EPFO Pension Hike : पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! 1 हजारांची पेन्शन थेट 3 हजार होणार? मोठी अपडेट समोर

EPS Pension Update 2026: EPFO पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी पेन्शन योजनेतली मासिक पेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
EPFO Latest News
EPFO Latest Newssaam tv
Published On: 

खासगी कंपनीत नोकरी करून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना दरमहा १ हजार रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम वाढवून ३ हजार रुपये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जातेय. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीकडे लाखो पेन्शनधारकांचं लक्ष लागलेलं आहे.

१९ नोव्हेंबरच्या बैठकीत काय होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) २४० वी बैठक १९ नोव्हेंबर रोजी गुजरातमधल्या गिर येथे होईल. या बैठकीत किमान मासिक पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

EPFO Latest News
Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजनेबाबत मोठी बातमी! आता घरबसल्या करता येणार अर्ज; सरकारने सुरू केली नवी सुविधा

सध्या EPS अंतर्गत पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान १ हजार रुपये मिळतात. ही पेन्शन ३ हजार रुपये करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जातेय. पण ३ हजार रुपये पेन्शनबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा सरकारी घोषणा झालेली नाही. त्यामुळे बैठकीनंतरच याबाबत चित्र स्पष्ट होईल.

EPFO Latest News
LPG Cylinder Price: आज रविवारी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? मुंबई, दिल्लीसह पाहा इतर शहरांतले नवे दर

PF आणि EPS मध्ये किती पैसे जमा होतात?

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगार आणि महागाई भत्त्याच्या (DA) १२ टक्के रक्कम PF खात्यात जमा केली जाते. कंपनीकडूनही १२ टक्के योगदान दिलं जातं. मात्र, कंपनीच्या योगदानातील ८.३३ टक्के रक्कम EPS म्हणजेच पेन्शन योजनेत जमा होते, तर उर्वरित ३.६७ टक्के EPF खात्यात जमा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.