घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Vastu Shastra Tips : वास्तुशास्त्रातील विशिष्ट उपायांनुसार, घराच्या प्रवेशद्वारावर तीन विशिष्ट वस्तू ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा प्रवाह वाढवण्याचे सोपे उपाय काय ते जाणून घ्या.
Best Vastu tips for attracting positive energy and wealth
Best Vastu tips for attracting positive energy and wealthsaam tv
Published On
Summary
  • मुख्य प्रवेशद्वाराला घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात महत्त्वाचे स्थान

  • प्रवेशद्वार स्वच्छ, प्रकाशमान आणि अडथळेमुक्त ठेवण्याचा सल्ला

  • काही विशिष्ट वस्तू किंवा शुभ चिन्हे ठेवण्याचे उपाय वास्तुशास्त्रात सांगितले जातात.

अनेकदा खूप मेहनत करूनही तुमच्याकडून पैसा लगेच खर्च होतो. हातात पैसा टिकत नाही. तुम्ही उत्पन्न मिळवता, तरीही खर्च आणि कर्जाचा बोजा वाढतच जातो का? अशा परिस्थितीत, आपण अनेकदा उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधतो, पण घरातील वातावरण आणि मुख्य प्रवेशद्वाराकडे मात्र दुर्लक्ष करत असतो.

Best Vastu tips for attracting positive energy and wealth
अपार्टमेंटमध्ये घर घेताय? कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणं असतं शुभ? घर खरेदीवेळी चार गोष्टी ठेवा डोक्यात

वास्तुशास्त्रामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला अत्यंत महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, याच ठिकाणावरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा प्रवेश होत असतो. म्हणूनच, आपण अशा तीन सोप्या पण प्रभावी वास्तु-उपायांविषयी जाणून घेऊ. त्यामुळे घरात सूख आणि समुद्धी येईल.

Best Vastu tips for attracting positive energy and wealth
भाड्याच्या घरातील दुरुस्ती अन् रंगकामाचा खर्च कोण करणार, भाडेकरू की घरमालक?

दरवाजाचा रंग आणि नेमप्लेट

वास्तूशास्त्राच्या तत्त्वांनुसार, मुख्य प्रवेशद्वारासाठी अतिशय गडद रंगांचा वापर टाळावा. विशेषतः काळा किंवा गडद निळा रंग वापरू नये. त्याऐवजी फिकट पिवळा, क्रीम किंवा ऑफ-व्हाइट (पांढरेशुभ्र नसलेला पांढरा) यांसारखे रंग शुभ मानले जातात.

जर तुम्ही नेमप्लेट लावणार असाल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक नीटनेटकी आणि स्वच्छ नेमप्लेट लावावी. तुम्ही लाकडी किंवा पितळी नेमप्लेट वापरू शकता. त्यावर नाव स्पष्टपणे दिसेल याची खात्री करा. तुटलेली, जुनी किंवा रंग उडालेली नेमप्लेट बदलणे अधिक चांगले असते.

काळी हळद

नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट (वाईट नजर) दूर करण्यासाठी काळ्या हळदीचा वापर करून हा पारंपरिक उपाय केला जातो. हा उपाय करण्यासाठी, काळ्या हळदीचा एक तुकडा आणि थोडीशी तुरटी एका लहान काळ्या कपड्यात बांधा. हे लहान गाठोडे मुख्य प्रवेशद्वाराजवळ, फारसे नजरेस न पडणाऱ्या ठिकाणी ठेवत असतात किंवा टांगत असतात. ही एक पारंपरिक वास्तू प्रथा असून बरेचजण ही प्रथा पाळतात.

उंबरठ्यासाठी विशेष उपाय

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उंबरठ्याला विशेष महत्त्व आहे. उंबरठ्याखाली चांदीची तार ठेवण्याची पारंपरिक प्रथा आहे. जर पण उंबरठ्याखाली ठेवण्यासाठी तोडफोड करणं शक्य नसेल तर एक सोपी पद्धत अवलंबली जाऊ शकते. दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठा नीट स्वच्छ करा. उंबरठ्यावर थोडी हळद मिसळलेले पाणीही तुम्ही शिंपडू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दरवाजासमोर बूट, कचरा किंवा अनावश्यक वस्तूंचा ढीग साचू देऊ नका.

हे देखील लक्षात ठेवा

मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक, ॐ किंवा 'शुभ-लाभ' यांसारखी चिन्हे लावणे शुभ मानले जाते. तुम्ही आंबा किंवा अशोकाच्या पानांपासून बनवलेले तोरणही लावू शकता. फक्त एवढेच सुनिश्चित करा की प्रवेशद्वार स्वच्छ, नीटनेटके आणि चांगल्या प्रकारे प्रकाशित असेल. घरातील वातावरण जितके सुव्यवस्थित असेल, तितकीच सकारात्मकता जाणवेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com