

फ्लॅटचा मजला निवडताना वास्तुशास्त्रासोबत व्यावहारिक बाबींचाही विचार करा.
दिशा, मुख्य प्रवेशद्वार आणि घराची रचना या वास्तुतील महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात.
घरात पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि हवा येते का, हे नक्की तपासा.
घर खरेदी करणे ही केवळ एक गुंतवणूक नाही, तर ते आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक असतं. म्हणूनच फ्लॅट खरेदी करताना अनेक लोक वास्तुशास्त्राला प्राधान्य देतात. ज्याप्रमाणे घराची दिशा, मुख्य प्रवेशद्वार आणि खोल्यांची रचना यांना अत्यंत महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे तो फ्लॅट कोणत्या मजल्यावर आहे, या गोष्टीलाही तितकेच महत्त्व दिले जातं.
वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, प्रत्येक मजल्यावर एक विशिष्ट ऊर्जा असते, जी घरातील वातावरण आणि तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असते. त्यामुळे, जर तुम्ही नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल, तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्यासाठी कोणता मजला सर्वात शुभ मानला ठरेल हे जाणून घेणे फायदेशीर ठरेल.
वास्तुशास्त्र हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांच्या समतोलावर आधारित आहे. इमारतीची उंची जसजशी वाढते, तसतसा या तत्त्वांचा प्रभाव बदलत जातो असे मानले जाते; म्हणूनच, वेगवेगळ्या मजल्यांचा संबंध वेगवेगळ्या ऊर्जांशी जोडला गेला आहे.
वास्तूनुसार, तळमजला हा पृथ्वी तत्त्वाच्या सर्वात जवळ असतो. तो स्थिरता, सुरक्षितता आणि भक्कम पाया यांचे प्रतीक मानला जातो. ज्यांना जीवनात समतोल आणि स्थैर्य हवे आहे, त्यांच्यासाठी हा मजला शुभ मानला जातो.
वास्तुशास्त्रानुसार पहिला, दुसरा आणि तिसरा मजला हे सर्वात शुभ मानले जातात. या मजल्यांवर पृथ्वी आणि जल या तत्त्वांचा उत्तम समतोल असल्याचे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि कौटुंबिक सौहार्द वाढीस लागते.
वरच्या मजल्यांवर हवा आणि आकाश या तत्त्वांचा प्रबळ प्रभाव असतो असे मानले जाते. अशा मजल्यांवर राहिल्याने मोकळेपणा, स्वतंत्र विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यास मदत होते. पृथ्वी तत्त्वाशी असलेला संपर्क कमी होत असल्याने घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये नैसर्गिक रंग, लाकूड आणि मातीशी संबंधित घटकांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
वास्तूशास्त्रानुसार सर्वात वरचा मजला पूर्णपणे अशुभ मानला जात नाही. जर फ्लॅटची दिशा, मुख्य प्रवेशद्वार आणि अंतर्गत रचना वास्तूच्या तत्त्वांशी सुसंगत असेन तर वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधूनही शुभ फळे मिळू शकतात. अशा फ्लॅट्समध्ये नैसर्गिक प्रकाश आणि मोकळे वातावरण सकारात्मक ऊर्जा वाढवतात, असे मानले जाते.
पूर्वाभिमुख फ्लॅट: समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक.
पश्चिमाभिमुख फ्लॅट: स्थिरता, मानसिक स्पष्टता आणि आर्थिक समतोल यांच्याशी संबंधित.
उत्तर-मुखी फ्लॅट: ही दिशा संपत्ती आणि संधींची मानली जाते.
दक्षिण-मुखी फ्लॅट: योग्य वास्तु-संतुलन असल्यास ही दिशा अनुकूल मानली जाते.
वास्तूनुसार फ्लॅटचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ, चांगला प्रकाश असलेले आणि अडथळ्यांपासून मुक्त असावे. कारण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचे ते मुख्य प्रवेशद्वार मानले जाते.
केवळ वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार करता, पहिला, दुसरा आणि तिसरा मजला हे सर्वात संतुलित आणि शुभ मानले जातात. हे मजले पृथ्वी आणि जल या तत्त्वांचा सुसंवाद दर्शवतात. यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. दरम्यान, तळमजला स्थिरतेसाठी योग्य मानला जातो, तर वरचे मजले मुक्त विचार आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी योग्य मानले जात असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.