Roti Vastu Tips: गोल होण्याऐवजी चपातीचा नकाशा होतोय? जाणून घ्या गोलकार चपातीचे वास्तू नियम

Bharat Jadhav

सुख-समृद्धीचे प्रतीक

भारतीय स्वयंपाकघरात, आईच्या हातांनी बनवलेल्या गरमागरम आणि अगदी गोल चपाती केवळ भूकच भागवत नाहीत, तर त्या घरात सुख-समृद्धीचे प्रतीकही मानल्या जातात. अनेकदा जेव्हा एखादी व्यक्ती स्वयंपाक करायला शिकत असते, तेव्हा चपाती गोल बनवण्यावरच सर्वाधिक भर दिला जातो.

वास्तूशास्त्र काय?

चपातीचा गोल आकार केवळ ती दिसायला छान दिसावी यासाठी नसतो? वास्तुशास्त्रामध्ये चपातीच्या आकाराबाबत काही महत्त्वपूर्ण तत्त्वे सांगितली आहेत.

चपातीचा नकाशा झाला तर?

जर चपातीचा आकार बिघडलेला असेल किंवा ती एखाद्या नकाशासारखी दिसत असेल, तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. यामागील वास्तुशास्त्राशी संबंधित कारणे जाणून घेऊया.

चपाती गोल असणे का महत्त्वाचे आहे?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे घरातील अत्यंत पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते. तेथे अन्नपूर्णा माता आणि अग्निदेव यांची विशेष कृपा असते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये, गोल आकार हा पूर्णत्व आणि विश्वाचे प्रतीक मानले जाते.

सकारात्मक ऊर्जा

स्वयंपाकघरात नियमितपणे गोल आणि सुडौल पोळ्या बनवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

घरात अशांतता

जर सतत फाटलेल्या किंवा अनियमित आकाराच्या चपात्या बनवल्या जात असतील, तर ते घरातील सदस्यांमधील मानसिक तणाव आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव दर्शवत असतात. यामुळे कुटुंबात कलह आणि घरात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते.

ग्रह होतात मजबूत

जेव्हा तव्यावर गोल चपाती भाजली जाते, तेव्हा आगीची ऊर्जा त्यावर सर्व बाजूंनी समान रीतीने पोहोचते. वास्तुशास्त्रानुसार, योग्य प्रकारे भाजलेली गोल चपाती मंगळ आणि सूर्य या ग्रह मजबूत करत असते.