Vastu Shastra: घरात नवरा-बायकोचा आणि कुटुंबाचा फोटो कुठे लावावा? चुकीची दिशा ठरेल वादाचं कारण, जाणून घ्या नियम

Photo Frame Vastu: घरात फोटो फ्रेम ठेवण्याची एक योग्य दिशा असते. वास्तुशास्त्रानुसार, योग्य दिशेला फोटो ठेवल्याने नातेसंबंध दृढ होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Photo Frame Vastu:
Placing family photos in the right Vastu direction can enhance positivity and strengthen bonds at home.saam tv
Published On
Summary
  • दक्षिण-पश्चिम दिशा फोटोसाठी सर्वात शुभ

  • नवरा-बायकोचा फोटो बेडरूममध्ये लावावा

  • चुकीची दिशा नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकते

घराच्या सजावटीत फोटो फ्रेम्सला एक विशेष स्थान आहे. फोटो केवळ भिंतींचे सौंदर्यच वाढवत नाहीत, तर आपल्या आठवणीही जपत असतात. कुटुंबासोबत घालवलेल्या खास क्षणांची आठवण फोटोमध्ये कैद केली जाते, त्यामुळे घरात एक सुखद वातावरण निर्माण होत असते. मात्र वास्तुशास्त्रानुसार, फोटो योग्य दिशेला ठेवणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

Photo Frame Vastu:
Vastu Tips Of Kitchen Gas Direction: किचनमध्ये गॅस- स्टो कोणत्या दिशेला ठेवावा? वाचा वास्तुशास्त्राचे हे 5 नियम

जर फोटो फ्रेम्स चुकीच्या दिशेला ठेवल्या तर, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि नात्यांमध्ये तणावही निर्माण होऊ शकतो. मग घरात फोटो फ्रेम्स ठेवण्यासाठी कोणती दिशा शुभ मानली जाते ते जाणून घेऊ.

Photo Frame Vastu:
Vastu Tips Of Money Attract: घराच्या कोपऱ्यात ठेवा ही वस्तू, वर्षभर भासणार नाही पैशाची कमतरता

फोटो फ्रेम्स योग्य दिशेने लावण्याचे परिणाम

आपल्या घराचे आणि खोल्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण भिंतींवर विविध प्रकारच्या फोटो फ्रेम्स लावत असतो. कुटुंब, मित्र किंवा खास क्षणांचे फोटो घराच्या सजावटीत भर घालत असतात. पण वास्तुशास्त्रानुसार, फोटो फ्रेम कोणत्या दिशेला ठेवल्या जातात यालाही विशेष महत्त्व आहे. योग्य दिशेला ठेवलेले फोटो घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात.

फोटो फ्रेम लावण्यासंबंधी वास्तू नियम काय

वास्तुशास्त्रानुसार, फोटो फ्रेम ठेवण्यासाठी घराची नैऋत्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशेत कौटुंबिक फोटो ठेवल्याने नात्यांमध्ये स्थिरता येते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट दिशांना चित्रे ठेवणे टाळावे. असे मानले जाते की पती-पत्नीची किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित चित्रे उत्तर आणि ईशान्य दिशांना ठेवू नयेत. यामुळे नात्यांमध्ये मतभेद आणि तणाव निर्माण होऊ शकतो.

यासह वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आणि संधीची दिशा मानली जाते, त्यामुळे या भिंतीवर जोडप्यांचे फोटो लावणे टाळावे. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला दुःखी किंवा नकारात्मक प्रतिमा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो.

घराचा ईशान्य कोपरा अत्यंत पवित्र मानला जातो. येथे देवाचे चित्र किंवा धार्मिक चित्र ठेवणे शुभ मानले जाते, परंतु विवाहित जोडप्याचे फोटो लावणे टाळावे. याव्यतिरिक्त, वास्तूनुसार, बेडरूममधील चित्रांसमोर थेट आरसा नसावा. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज आणि मतभेद वाढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com