Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील महत्वाचे नियम सांगितले आहेत. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूची दिशा कोणती असावी याविषयी देखील सांगितले आहे.
वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील अग्नी दिशा अत्यंत महत्वाची आहे यानुसार तुम्ही गॅस, शेगडी कोणत्या दिशेला ठेवता हे देखील महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार गॅस शेगडी नेहमी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात असणे योग्य आहे. स्वयंपाकघराची आग्नेय बाजून ही अग्नी देवतेची स्थान मानली जाते.
किचनमध्ये अन्न बनवताना तुमचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे यामुळे घरातील सदस्यांवर त्याचा परिणाम होतो आणि सकारात्मक उर्जा टिकून राहते.
वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि पाणी हे विरोधक आहेत यानुसार स्वयंपाकघरात गॅस, आणि पाण्याचा नळ हे एकाचे एकमेकांच्या एकदम शेजारी नसावेत.
गॅस शेगडी कधीही खिडकीच्या अगदी समोर नसावी. तसेच, शेगडी घराच्या मुख्य दरवाजातून थेट दिसणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे घरातील लक्ष्मी टिकून राहण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी गॅस शेगडी आणि ओटा पूर्णपणे स्वच्छ करावा. खरकटी भांडी किंवा घाण ओट्यावर ठेवल्याने नकारात्मकता येते आणि देवी अन्नपूर्णा प्रसन्न होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.