Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार , गुढीपाडवा या नवीन सुरूवात शुभ करावी. यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही काही खास वस्तू ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.
ईशान्य कोपरा हा देवी लक्ष्मीचा मानला जातो येथून सकारात्मकता घरात प्रवेश करतो.
वास्तुशास्त्रात ईशान्य कोपरा हा जल तत्त्वाचा मानला जातो. या कोपऱ्यात तांब्याचा किंवा पितळेचा कलश स्वच्छ पाण्याने भरून ठेवा. त्यावर अक्षता आणि फुले वाहा.
हा कोपरा कुबेर आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी सर्वोत्तम मानला जातो. पाडव्याच्या दिवशी येथे कुबेर यंत्र किंवा लक्ष्मीची पावले लावा.
घोड्यांची जोडी हे यशाचे आणि वेगाचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल, तर ईशान्य कोपऱ्यात पांढऱ्या रंगाच्या धावणाऱ्या घोड्यांची जोडी किंवा चित्र ठेवा.
ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात लावण्यासाठी पितळी समई किंवा नंदादीप प्रसन्न वातावरण निर्माण करतात म्हणून दिवे लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.