

रात्री अचानक जाग येणे आणि वाईट स्वप्ने ही गंभीर मानसिक तणावाची चिन्हे असू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा आणि वातावरण झोपेवर परिणाम करते.
चंद्र आणि राहू कमजोर असल्यास भीती आणि अस्वस्थता वाढू शकते.
बऱ्याच लोकांना अचानक जाग येणे, वाईट स्वप्ने पडणे किंवा अनाकलनीय अस्वस्थता जाणवते. काही लोक तासनतास अंथरुणात पडून राहतात, तरीही त्यांना नीट झोप लागत नाही. अनेक लोक क्षुल्लक गोष्टींवर इतका विचार करत बसतात की त्यांचे मन शांत राहत नाही, सतत काहूर असतं. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, अशा समस्यांसाठी ग्रह आणि घराची दिशा देखील जबाबदार मानली जाते. जर कुंडलीत चंद्र किंवा राहू कमजोर असेल, तर व्यक्तीला मानसिक ताण आणि भीतीचा त्रास होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मन आणि भावनांशी संबंधित आहे. कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर व्यक्तीचे मन अस्थिर असते. अशा व्यक्ती लहानसहान गोष्टींवरून खूप चिंता व्यक्त करत बसतात. कधीकधी भीती, चिंता आणि अतिविचार वाढत असतात, याचा थेट परिणाम झोपेवर होत असतो. व्यक्तीला रात्री वारंवार जाग येऊ शकते किंवा अस्वस्थ स्वप्ने पडू शकतात. दरम्यान राहूला गोंधळ आणि मानसिक संभ्रमाचा ग्रह मानले जाते. जर राहू कमजोर किंवा अशुभ स्थितीत असेल तर भीती आणि नकारात्मक विचार अधिक त्रासदायक ठरू शकतात.
वास्तुशास्त्रात बेडरुमला खूप महत्व आहे. जर बेडरूम चुकीच्या दिशेला असला तर आपली ग्रह दिशा बदलत असते. बेडरुम चुकीच्या दिशेला असेल किंवा अंथरूण व्यवस्थित नसेल तर आपल्याला मानसीक शांती मिळत नाही. नैऋत्य दिशा बेडरुमसाठी शुभ मानली जाते. विशिष्ट दिशांना डोके करून झोपणे हानिकारक मानले जाते. वास्तू तत्त्वांनुसार, चुकीच्या दिशेला झोपल्याने झोपेत वारंवार व्यत्यय येऊ शकतो आणि मन अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे, खोलीची मांडणी आणि दिशेकडे लक्ष देणे उचित ठरते.
तज्ञांच्या मते, खोलीतील अधिक अंधार, पसारा किंवा जड वस्तूंमुळे नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही. रात्री जास्त वेळ मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहिल्यामुळे काही लोकांना चांगली झोप लागण्यासही त्रास होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राला बलवान करण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे, शांत वातावरण राखणे आणि ध्यान करणे यांचा सल्ला दिला जातो. राहूशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी नियमित प्रार्थना आणि सकारात्मक विचार आवश्यक मानले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.