Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

Vastu Shastra: अंथरुणात बसून खाणं ही एक वाईट सवय आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, ही एक अशी सवय आहे ज्यामुळे नकारात्मक वाढत असते.
Vastu Shastra:
VASTU SHASTRA TIPS: EATING FOOD ON BED CAN INVITE NEGATIVE ENERGY AND PROBLEMSsaam tv
Published On
Summary
  • अंथरुणात बसून जेवण करणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

  • या सवयीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

  • मानसिक तणाव आणि आळस वाढण्याची शक्यता असते.

आजच्या धकाधुकीच्या जीवनात लोक अनेकदा अंथरुणात बसून आरामात जेवण करणे पसंत करतात. मोबाईल फोन किंवा टीव्हीवर आपला आवडता वेब सीरिज किंवा चित्रपट चालू करतात आणि आरामत दुपार किंवा रात्रीचे जेवण खातात. परंतु तुम्हाला माहितीये का? ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार ही सवय शुभ मानली जात नाही. यामुळे तुम्हाला कशाप्रकारे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, हे आपण जाणून घेऊ.

Vastu Shastra:
Yavatmal Crime: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; झोपेतच तरुणावर कुऱ्हाडीने सापासप वार

विश्रांतीच्या ठिकाणी जेवण करणं चुकीचं

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागा एका विशिष्ट ऊर्जेशी संबंधित असते. पलंग हे विश्रांती, झोप आणि मानसिक शांतीचे स्थान मानले जाते. तर जेवणासाठी एक वेगळी जागा निश्चित केली जाते. एकाच ठिकाणी जेवणे आणि विश्रांती घेणे चुकीचे मानले जाते. एखादी व्यक्ती पलंगावर बसून जेवते, तेव्हा या दोन ऊर्जांचा समतोल बिघडतो, ज्यामुळे घराच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो.

Vastu Shastra:
सात महिन्यापासून मुलीचा शोध लागेना! हतबल आई-वडिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ का मानले जाते?

ज्योतिषशास्त्रानुसार खाणे हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून, ऊर्जा मिळवण्याची एक प्रक्रिया देखील आहे. त्यामुळे जेवण नेहमी स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणातच केले पाहिजे. सतत अंथरुणात बसून जेवल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह कमजोर होऊ शकतात. हे ग्रह मानसिक शांती, आनंद आणि नातेसंबंधांमधील संतुलनाशी संबंधित मानले जातात.

तणाव आणि आळस

ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते जे लोक दररोज अंथरुणात बसून जेवतात, त्यांना नेहमी आळस येत असतो आणि मानसिक गोंधळ उडत असतो.विशेष म्हणजे त्याची त्यांना जाणीव देखील होत असते. जेवताना मोबाईल फोन किंवा टेलिव्हिजनचा अतिवापर केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेवर आणि मानसिक ऊर्जेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. यामुळे झोपेच्या समस्या आणि चिडचिड देखील वाढू शकते.

आर्थिक समस्यांशी संबंधित

धर्मग्रंथांमध्ये अन्नाचा संबंध अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी माता यांच्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे अन्नाचा अनादर करणे किंवा चुकीच्या ठिकाणी भोजन करणे, आर्थिक अस्थिरतेस कारणीभूत ठरू शकते. यामुळे घरगुती खर्चात अचानक वाढ होते, असं मानले जाते. यामुळे जेवण नेहमी जेवणाच्या टेबलावर किंवा स्वच्छ जागेतच केले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, मानसिक शांती वाढते आणि कौटुंबिक सलोखा सुधारत असतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धांवर आधारित आहे. यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com