Liver Health : सावधान! रोजच्या या सवयी तुमचे लिव्हर शांतपणे करत आहेत निकामी; वेळीच ओळखा धोका

Fatty Liver : रोजच्या चुकीच्या सवयी, अनारोग्यदायी आहार, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव लिव्हरचं नुकसान करू शकतात. योग्य आहार, नियमित हालचाल आणि वेळेवर तपासणी करून लिव्हरचे आरोग्य जपा.
Liver Health
Liver Healthmeta ai
Published On

लिव्हर (Liver) हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या आणि कार्यक्षम अवयवांपैकी एक आहे. शरीरात लिव्हर ५०० हून अधिक महत्त्वाची कार्ये करतं. यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, पोषक तत्त्वांचे आणि औषधांचे चयापचय करणे, पचनासाठी पित्त तयार करणे, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करणे तसेच महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे साठवून ठेवणे यांचा समावेश होतो.

मात्र, या सर्व गुणधर्मांनंतरही अन हेल्दी जीवनशैलीमुळे लिव्हरचं नुकसान होण्याचा धोका असतो. यातील चांगली बाब म्हणजे लिव्हरशी संबंधित अनेक आजार टाळता येऊ शकतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींचा लिव्हरच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

आहार: लिव्हरचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे साधन

लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ. अरविंद बडिगर, टेक्निकल डायरेक्टर, BDR Pharmaceuticals International Pvt. Ltd यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, साखरयुक्त पेये, सॅच्युरेटेड फॅट्स आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ असलेला अन हेल्दी आहार NAFLD अर्थात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढवतो. या आजाराला अलीकडे मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे नाव देण्यात आले आहे. सध्या हा क्रॉनिक लिव्हर डिसीजचे प्रमुख कारण ठरत आहे.

Liver Health
Guru Purnima 2026 Rajyog : गुरु पौर्णिमेला ६० वर्षांनंतर जुळून आला राजयोग; या ४ राशींचं नशीब चमकणार, पैसाच पैसा मिळणार

याउलट, फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, कमी फॅट असलेले मांस, कडधान्ये, नट्स आणि आरोग्यदायी तेलांचा समावेश असलेला आहार लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. बेरीज, पालेभाज्या, हळद, लसूण आणि ग्रीन टी यांसारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थांचे सेवन लिव्हरचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

शारीरिक हालचाल आणि निरोगी वजन राखणे अत्यंत महत्त्वाचे

लिव्हरला होणारे नुकसान टाळण्यासाठी शारीरिक हालचाल हा सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. प्रौढ व्यक्तींनी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. त्यासोबत आठवड्यातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा स्नायू मजबूत करणारे व्यायाम करणेही आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते,लिव्हरमधील चरबी कमी होण्यास मदत होते आणि लठ्ठपणा तसेच टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

निरोगी वजन राखणे हे शारीरिक सक्रियतेइतकेच महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे, त्यांनी आपल्या शरीराच्या वजनाच्या ५ ते १० टक्के वजन कमी केल्यास लिव्हरमधील चरबी कमी होण्यास आणि लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

मद्यपान आणि औषधे: काळजीपूर्वक वापर करा

जगभरात लिव्हरशी संबंधित समस्यांचे एक प्रमुख कारण मद्यपान आहे. अतिमद्यपानामुळे फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपॅटायटिस, यकृतावर व्रण निर्माण होणे, लिव्हर सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे टाळणे हा लिव्हरचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

त्याचप्रमाणे, औषधांचाही योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा अतिप्रमाणात घेतलेली काही वेदनाशामक औषधे, काही अँटीबायोटिक्स आणि हर्बल औषधे लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतात.

उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला

मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा कुटुंबात हेपॅटायटिसचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे लिव्हरशी संबंधित समस्या लवकर ओळखण्यास आणि पुढील नुकसान टाळण्यास मदत होते.

हेपॅटायटिस ए आणि बी विरुद्ध लसीकरण, चांगली स्वच्छता राखणे, असुरक्षित इंजेक्शन्स टाळणे तसेच सुरक्षित अन्न आणि पाण्याचे सेवन करणे हे व्हायरल हेपॅटायटिसपासून संरक्षण मिळवण्याचे महत्त्वाचे उपाय आहेत.

Liver Health
Chanakya Niti : मुलांना करिअरमध्ये यशस्वी कराचंय? चाणक्यांच्या या ४ गोष्टी पालकांनी नक्कीच वाचा

लिव्हर दररोज कोणतीही तक्रार न करता आपले काम करत असते आणि आजारी पडेपर्यंत त्याला विशेष काळजीची गरज आहे असे आपल्याला जाणवत नाही. मात्र, त्याचे आरोग्य जपण्यासाठी कोणत्याही कठीण उपायांची किंवा कठोर आहाराची गरज नसते; फक्त निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, मद्यपान आणि औषधांचा जबाबदारीने वापर तसेच शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे या सोप्या सवयींमुळे लिव्हर अनेक वर्षे निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com