Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि थोर विचारवंत गुरू मानले जातात. त्यांचे विचार भविष्यात मोठा निर्णय घेण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
चाणक्यांच्या मते, मुलांना करिअरमध्ये योग्य मार्गाला लावायचं असेल तर तुम्ही चाणक्य नितीतले काही नियम लक्षात ठेवले पाहिजे.
ज्यांच्या मुलांना लहानपणापासून अनेक गोष्टींविषयी वास्तवाविषयी माहिती असते. ते भविष्यात चतूराईने यश मिळवू शकतात.
मुलं लहान असतानाच तुम्ही त्यांना विविध गोष्टींचे ज्ञान दिलं पाहिजे. तेव्हाच त्यांना बुद्धीमान होता येईल.
मुलं लहान असतानाच त्यांना संस्कार दिले पाहिजेत. वाईट काय चांगलं काय, याबद्दल शिकवण दिली पाहिजे.
जी मुलं खोटं बोलणं, वागणं, जास्त राग, द्वेश यापासून लांब राहतात. ही मुलं भविष्यात आई-वडिलांचं नाव मोठं करतात.
जी मुलं दयाळू स्वभावाची असतात. अशी मुलांमुळे घरातलं वातावरण प्रसन्न खुश राहतं.
पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी ओळखून करिअरचे मार्ग त्यांना दाखवले पाहिजेत. त्याच्यातल्या कला ओळखल्या पाहिजेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.