Ragi For Diabetes : रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Sakshi Sunil Jadhav

डायबेटीजचे रुग्ण

डायबेटीज (Diabetes) ही समस्या सध्या झपाट्याने वाढत चालली आहे. रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहत नसेल तर ह्रदयविकार, किडनीचे आजार, मज्जातंतूंचे नुकसान, डोळ्यांचे विकार अशा समस्यांना सामोरं जावं लागतं.

Ragi For Diabetes | pintrest

रामबाण उपाय

तुम्ही अशावेळेस नाचणीचा आहारात समावेश करू शकता. कारण त्याचे गुणधर्म डायबेटीजसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

Finger millet benefits

नाचणीतला ग्लायसेमिक इंडेक्स (GI)

नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे त्यातले ग्लुकोज हळूहळू रक्तात मिसळतं. त्यामुळे रक्तातली साखर अचानक वाढत नाही.

Glycemic Index (GI) of gram flour

फायबरचा फायदा

नाचणीत आहारातील तंतू (Dietary Fibre) मुबलक प्रमाणात असतात. त्याने ग्लुकोजचं शोषण मंदावतं आणि रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Benefits of Fiber

मॅग्नेशियमचा फायदा

नाचणीत असणाऱ्या मॅग्नेशियममुळे शरीरातल्या इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारायला मदत होते. टाइप - २ डायबेटीजच्या रुग्णांना याचा जास्त फायदा होतो.

Benefits of Magnesium

ग्लूटेन -फ्री धान्य

ग्लूटेनची अॅलर्जी किंवा सेलिअॅक आजार असलेल्या व्यक्तींसाठी नाचणी हा सुरक्षित आणि पौष्टीक ऑप्शन आहे.

Gluten-free grain

नाचणीची पौष्टिक पेज

रागीच्या पिठाची पेज बनवून सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि रक्तातली साखर संतुलित राहण्यास मदत होते.

Nutritious side of ragi

योग्य पर्याय

गव्हाच्या पिठाऐवजी किंवा त्यासोबत नाचणीचे पीठ वापरून भाकरी किंवा थालीपीठ तयार करू शकता. हा नाश्ता डायबेटीजच्या रुग्णांसाठी योग्य आहे.

Best grains for diabetes

टीप

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मधुमेहाचे उपचार किंवा आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Best grains for diabetes

NEXT : रोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून दुर्गंधी येते? 'ही' सवय बदलली तर समस्या दूर होईल

Bottle Cleaning Tips
येथे क्लिक करा