Guru Purnima 2026 Rajyog : गुरु पौर्णिमेला ६० वर्षांनंतर जुळून आला राजयोग; या ४ राशींचं नशीब चमकणार, पैसाच पैसा मिळणार

Guru Purnima 2026 Shubh Sanyog : गुरु पौर्णिमा २०२६ रोजी ६० वर्षानंतर दुर्मिळ राजयोग तयार होत असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितलं जात आहे. यामध्ये काही लकी राशींसाठी धनलाभ, करिअर प्रगती व शुभ संधींचे संकेत आहेत.
Guru Purnima 2026
Guru Purnima 2026meta ai
Published On

गुरु पौर्णिमेला काही राशींचे भाग्य उजळणार आहे. २९ जुलै २०२६ रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक शुभ ग्रहयोग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. धन, सौंदर्य आणि सुखाचे कारक शुक्र तसेच ऊर्जा, धैर्य आणि पराक्रमाचे कारक मंगळ हे केंद्र दृष्टी योग निर्माण करणार आहेत. ज्योतिषाच्या मतानुसार हा योग काही राशींसाठी आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल ६० वर्षांनंतर हा राजयोग जुळून आला आहे.

मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता, बांधकाम, सौंदर्य किंवा फॅशन क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला फायदा होऊ शकतो.

वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसू शकते. वरिष्ठांकडून कौतूक मिळण्याची शक्यता आहे. कामात बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सरकारी कामांमध्येही यश मिळण्याचे संकेत आहेत.

Guru Purnima 2026
PUC Certificate: वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता ३ वर्षांतून एकदाच करावी लागणार PUC टेस्ट; सरकारचा प्रस्ताव

तूळ (Libra): तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग सुख- सुविधांमध्ये वाढ करणारा ठरू शकतो. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल मानला जातो. वैवाहिक जीवनातही चांगले वातावरण राहू शकते.

मकर (Capricorn): मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसेच दूरचा किंवा परदेश प्रवासाचा योगही जुळून येऊ शकतो.

Guru Purnima 2026
ITR, LPG ते बँकिंग, १ ऑगस्टपासून बदलणार 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

शुभ योगाचा लाभ मिळवण्यासाठी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजींचे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीचे दर्शन घ्या. "ॐ शुक्राय नमः" आणि "ॐ भौमाय नमः" या मंत्रांचा जप करा. तसेच एखाद्या मुलीला फळे किंवा पांढरी मिठाई दान केल्याने शुभ फळ मिळेल, अशी श्रद्धा आहे.

टीप: ही माहिती ज्योतिषशास्त्रातील मान्यता आणि श्रद्धांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही. साम टिव्ही याच्याशी समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com