Summer Travel Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत लाँग ट्रिप प्लान करताय? 'या' १० वस्तू सोबत ठेवाच

Summer Bag Packing Tips : उन्हाळ्यात पिकनिकला जाताना ट्रॅव्हल बॅगमध्ये काही वस्तू ठेवणे खूप गरजेचे असते. यामुळे तुमचा प्रवास खूप आरामदायी आणि सुखकर होतो. १० वस्तूंची यादी आताच नोट करा.
Summer Bag Packing Tips
Summer Travel Tips SAAM TV
Published On

मे महिना हा फिरण्याचा आणि तुफान मजा-मस्ती करण्याचा काळ असतो. आपण या महिन्यात अनेक फिरण्याचे प्लान करतो. मात्र मे महिन्यात ऊन खूप जास्त असते. त्यामुळे पिकनिकला जाताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेत. तुमची उन्हाळ्यातील ट्रिप आरामदायी होण्यासाठी तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये (Summer Bag Packing Tips) या १० वस्तूंचा आवर्जून समावेश करा. यामुळे तुम्ही फिरण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात पिकनिक प्लान करत असाल तर सनस्क्रीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही बाहेर फिरतानाही चेहऱ्याला सनस्क्रीन आवर्जून लावा. तसेच तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवा.

सनग्लासेस

तुम्ही उन्हात ट्रॅव्हल करणार त्यामुळे डोळ्यांची आग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळावा म्हणून सनग्लासेस कायम तुमच्यासोबत ठेवा. यामुळे सूर्यकिरणांपासून तुमचा बचाव होईल. तसेच पिकनिकमध्ये तुमचा स्टायलिश लूकही दिसेल.

कॅप आणि स्कार्फ

उन्हाळ्यात कॅप आणि स्कार्फ शिवाय बाहेर पडूच नका. बॅगमध्ये देखील अधिकचा स्कार्फ ठेवून द्या. स्कार्फमुळे तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण होते. तर कॅपमुळे उन्हात डोके तापत नाही. तसेच डोकेदुखी वाढत नाही.

Summer Bag Packing Tips
Spicy Dal Khichdi: हॉटेल स्टाईल चमचमीत डाल खिचडी कशी बनवायची? जाणून घ्या एकदम सोपी रेसिपी

वाटरप्रूफ मेकअप

पिकनिक म्हटली की मेकअप आला. विशेषता उन्हाळ्यात वाटरप्रूफ मेकअप करावा. कारण तुम्हाला उन्हात सतत चालल्यामुळे घामाने तुमचा मेकअप पसरू शकतो. त्यामुळे वाटरप्रूफ मेकअपचा वापर करा. तसेच वाटरप्रूफ मेकअप किट बॅगमध्ये ठेवा.

परफ्यूम

उन्हाळ्याच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये परफ्यूम असायलाच हवा. कारण उन्हाळ्यात सतत घाम येतो. त्यामुळे परफ्यूममुळे तुम्ही कायम रिफ्रेश रहाल.

टिश्यू पेपर/फेस वाइप/ छोटे रुमाल

उन्हाळ्यात पिकनिक म्हणजे खूप प्रवास होतो. त्यामुळे कायम तुमच्या बॅगमध्ये टिश्यू पेपर आणि फेस वाइपचे पाकिट आवर्जून ठेवा. तसेच छोटे रुमालसोबत राहू द्या. यामुळे तुम्हाला प्रवासात अडचणी येणार नाही. यामुळे उन्हाळ्यातही तुमचा चेहरा चकचकीत दिसेल.

औषधे

उन्हाळ्यात पिकनिकला जाताना न विसरता ट्रॅव्हल बॅगमध्ये औषधे ठेवा. कारण वाढत्या उन्हात प्रवास केल्यामुळे तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. अशा वेळी जर औषधेसोबत असल्याच तुम्ही डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणे यांसारख्या समस्यांपासून दूर रहाल.

फूड

पिकनिकच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये आवर्जून फळे, ज्यूस, प्रोटीन फूड, थंड पदार्थ ठेवा. यामुळे तुम्ही पिकनिकमध्ये सतत हायड्रेट रहाल. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तसेच उन्हाळ्यात बाहेर जाताना कायम गोड पदार्थ उदा. चॉकलेट कायम आपल्या सोबत ठेवावे.

कपडे

तुम्ही उन्हाळ्यात पिकनिक प्लान करत असल्यामुळे कपड्यांकडे विशेष लक्ष द्या. जास्त अंगाला घट्ट बसणारे कपडे घालू नका. ज्यात तुम्ही खूप प्रवास करू शकाला आणि सर्वात महत्त्वाचे कम्फर्टेबल असाल असे कपडे घाला.

सॅनिटायझर

पिकनिक प्लान करताना आवर्जून सॅनिटायझर, लिक्विड सोप आणि फेसवॉश ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवा. प्रवासात प्रत्येक वेळी या गोष्टी तुम्हाला उपयोगात येतील.

Summer Bag Packing Tips
Hair Care: केसांच्या वाढीसाठी आणि मजबूत करण्यासाठी मेथीचे दाणे ठरतील फायदेशीर, असा वापर करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com