कोमल दामुद्रे
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्याला नेहमी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु, सनस्क्रिन लावताना कोणत्या चुका करु नये जाणून घेऊया
जर तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि झाकलेले कपडे घाला.
मेकअप करण्यापूर्वी तुम्ही सनस्क्रीन लावा. यामुळे चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल.
सनस्क्रीन लावताना थोड्या प्रमाणात लावू नका. सूर्याच्या अतिनील किरणांचा आपल्या त्वचेवर अधिक परिणाम होतो.
तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार सनस्क्रीन निवडा. उन्हात त्वचा जळजळत असेल तर एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडा
तज्ज्ञ आपल्याला SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतात.
कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे केव्हा ही चांगले यामुळे त्वचेचे रक्षण होते.