Surya Gochar 2024 : सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश! या ५ लोकांचे नशीब फळफळणार, मानसन्मान वाढेल

Surya Gochar Horoscope :ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करतात. १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांना यश मिळेल.
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024Saam Tv

Surya Gochar In Kumbh Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करतात. १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांना यश मिळेल.

सूर्य देवाच्या बदलामुळे काही राशींच्या लोकांना नशीब नक्कीच मिळू शकते. सूर्याच्या संक्रमणामुळे ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे. तसेच मानसन्मान देखील वाढणार आहे. माणसाला खूप मान सन्मान मिळतो आणि धनाची प्राप्ती होते. कोणत्या राशींना फायदा (Benefits) होणार आहे जाणून घ्या.

1. वृषभ

सूर्याच्या संक्रमणामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक (Marriage) जीवनात आनंद येईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात यश (Success) मिळेल.

Surya Gochar 2024
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : व्हॅलेंटाइन स्पेशल! या राशींच्या जोडप्यांसाठी हा आठवडा अधिक महत्त्वाचा, नात्यात येईल दूरावा

2. सिंह

ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होतील. आर्थिक बाजू मजबूत होईल, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. सिंह राशीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

3. कन्या

सूर्याच्या संक्रमणामुळे मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी संवाद साधाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आर्थिक लाभ होतील ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगली आहे.

Surya Gochar 2024
Shani Asta 2024 : कुंभ राशीत शनिचा अस्त! ४ राशींची साडेसाती संपणार, प्रेमाचे नाते बहरणार

4. वृश्चिक

सूर्याच्या संक्रमणामुळे या काळात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. संयम राखणे अधिक गरजेचा आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल.

5. धनु

धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची चांगली संधी आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामात यश मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com