Sugar Side Effects: अचानक साखर खाणं सोडणं पडेल महागात, चेहऱ्यावर दिसतील हे गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Skin Care Tips: अचानक साखर सोडल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते, त्वचेचा ग्लो कमी होतो, सुरकुत्या वाढतात आणि ताण वाढतो. योग्य प्रमाणात साखर आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Diet mistakes in fitness journey
Sudden sugar quitting side effectsgoogle
Published On

सध्या अनेकांना फिटनेस फॉलो करायला प्रचंड आवडायला लागलं आहे. फिटनेसमुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फरक झालेला दिसतो. आपण पुरेशी झोप घेतो, सकाळी लवकर उठून व्यायाम करतो, डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, उत्तम डाएट फॉलो करतो. पण बऱ्याचदा सोशल मीडियाचा वापर करुन लोक त्यांच्या आहाराबाबतचे मोठे निर्णय घेतात. याचा थेट गंभीर परिणाम तुमच्या शरीराला सहन करावा लागू शकतो.

पुढील माहितीत आपण एक गंभीर बाब आणि त्याने शरीरावर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी लोक फिटराहण्यासाठी त्यांच्या आहारात बदल करतात. त्यामध्ये लोक साखर सोडण्याचा निर्णय घेतात. त्याने वजन कमी होते, मेटाबॉलिजम वाढतो असं सगळ्यांना वाटतं. म्हणून पूर्णपणे साखर खाणं लोक थांबवतात. याचा तुमच्याशरीरावर ४ प्रकारे परिणाम होऊ शकतो.

Diet mistakes in fitness journey
Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

(१) शरीराला हवी असणारी ऊर्जा - तुम्ही जेव्हा अचानक साखर खाणं-पिणं सोडता. तेव्हा तुमच्या शरीराला हवी असणारी शुगर किंवा ग्लूकोज मिळत नाही. याने तुम्हाला सतत चिडचिड आणि ताण-तणावाच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

(२) शरीरातील कोलेजनची पातळी - त्वचेची लवचिकता, हाडे, सांधेदुखी आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी कोलेजन आवश्यक असतं. ते तुम्हाला साखरेतून मिळत असतं. जर तुम्ही साखर सोडलीत तर तुम्हीला कमी वयात म्हणजेच पंचवीशीतच अंटी एजींगच्या समस्यांना सामोरं लागतं. चेहरा ड्राय होतो आणि डल दिसतो.

(३) स्ट्रेस हार्मोन्स वाढणे - तुम्ही जर रोजच्या आहारात साखरेचा समावेशच केला नाहीत तर तुमच्या स्ट्रेस हार्मोन्सवर परिणाम होतो. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात.

(४) त्वचेसाठी आवश्यक न्यूट्रिशन - जेव्हा तुम्ही कार्ब्सचे कमी प्रमाणात सेवन करता. तेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होते. त्याने चेहऱ्यावरचा ग्लो आपोआप कमी होतो. त्यामुळे आहारातली साखर काढून टाकून तुम्ही फळं, डाळींब, प्रोटीन आणि हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश करुन योग्य प्रकारे डाएट फॉलो करु शकता. कारण तुमचा चेहराच सकाळी उठल्यावर पाहता. जर तोच व्यवस्थित नसेल तर तुम्हाला संपूर्ण दिवस ताणात घालवावा लागू शकतो.

Diet mistakes in fitness journey
Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com